Mumbai Best Bus Fire saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Best Fire: बेस्ट बस आगीत जळून खाक! अंधेरी पूर्व स्थानक परिसरातील थरारक घटना

Mumbai Best Fire: मुंबईच्या अंधेरी पूर्व रेल्वे स्थानक परिसरात बेस्ट बसला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Best Bus Fire: मुंबईच्या अंधेरी पूर्व रेल्वे स्थानक परिसरात बेस्ट बसला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत बेस्ट बस पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बेस्ट बसला लागलेल्या या आगीमुळे अंधेरी पूर्व स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं. अंधेरी पूर्व आगरकर चौकात असलेल्या टॅक्स इमारतीजवळील अलविन झेरॉक्स समोर ही घटना गडली. या ठिकाणी बस आली असता अचानक बसणे पेट घेतला आणि पाहता पाहता काही क्षणातच संपूर्ण बस आगीमध्ये जळून खाक झाली. (Mumbai News)

बेस्टची तिसरी बस जळण्याच्या घटनेनंतर मातेश्वरी या कंत्राटदाराच्या भाडेतत्वावरील ४०० बसेस ताफ्यातून कमी करण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. टाटा मार्कोपोलो या कंपनीकडून घेतलेल्या या बसेस बेस्टच्या वेगवेगळ्या डेपोंमध्ये चालवण्यात येत होत्या. या बसेस उद्यापासून कमी करण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. या कमी झालेल्या बसेसच्या मार्गावर प्रवाशांची गैरसोय होणार आहे. (Latest Marathi News)

मातेश्वरी या कंत्राटदाराकडून पुरवण्यात आलेल्या बसेसमधील बस जळण्याची ही दोन महिन्यातील तिसरी घटना आहे. याआधी दिल्लीतही अशा प्रकारच्या आगीची घटना घडली होती. मुंबईतील याआधीच्या दोन घटनेनंतर बेस्ट परिवहन विभागाने बैठक घेऊन या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT