Mumbai Best Bus Accidents SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Best Bus Accident : भयंकर! भरधाव बेस्ट बसने पादचाऱ्याला उडवलं; थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

Best Bus Accident Video : बेस्ट बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्रथमिक माहिती समोर येत आहे.

Chandrakant Jagtap

>> सचिन गाड, साम टीव्ही

Mumbai Bus Accident Videos : मुंबईत बस अपघातात एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. बेस्ट बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्रथमिक माहिती समोर येत आहे. बाळाराम बागवे असे या अपघातात मृत्यू झालेल्या ५४ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कफ परेड बधावर पार्क येथे ही घटना घडली. बेस्ट बस चालकाचा ताबा सुटला आणि त्याने थेट रस्त्याच्या कडेने जात असलेल्या पादचाऱ्याला उडवलं. एवढंच नाही तर त्यानंतरही बस थांबली नाही. या बसने पुढे उभी असलेल्या एका खासगी बसलाही धडक दिली आणि त्या बसला ढकलत दूरपर्यंत नेले.

अपघातग्रस्त व्यक्तीला बेस्ट बसने उडवलं. त्यानंतर तो समोर उभी असलेल्या दुसऱ्या बसवर जाऊन आदळला. मग त्यानंतर पुन्हा मागून आलेली बेस्ट आणि खासगी बस या दोन्ही बसच्यामध्ये तो चेंगरुन गेल्यानं त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेले ५४ वर्षीय बाळाराम बागवे हे बँक कर्मचारी होते. या अपघातात बेस्ट बसचा चालक देखील जखमी झाला आहे. (Breaking News)

या अपघातानंतर बेस्ट चालकाविरोधात कामात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात काही दुचाकी आणि वाहनांचं देखील नुकसान झालं आहे. ही संपूर्ण घटना परिसरात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांची बारामतीमधून १५०० मतांनी आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT