Auto Taxi Drivers Strike 
मुंबई/पुणे

Auto Drivers Strike : मुंबईत परप्रांतिय चालकांचा संप, ३ दिवस रिक्षा-टॅक्सी बंद; कारण ऐकून तुम्हालाही राग येईल

Auto Taxi Drivers Strike : मुंबईतील रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांनी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या नियमाविरोधात तीन दिवसांचा संप पुकारला आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai Auto and Taxi Drivers Call 3-Day Strike : मुंबईत ऑटो, टॅक्सी आणि कॅब चालकांसाठी राज्य सरकारने मराठी भाषा अनिवार्य केली आहे. या निर्णयावरून नवा वाद पेटला आहे. मुंबईतील काही चालकाने मराठी बोलण्यास नकार दिलाय. राज्य सरकारकडून मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकावर कारवाईचा बडगा उगारला आहे. मराठी सक्तीच्या नियमाला विरोध करत शहरातील रिक्षाचालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी ३ दिवसांचा संप पुकारला आहे. रस्त्यावर उतरून निदर्शने करणाऱ्या चालकांमुळे सर्वसामान्यांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ऑटो-रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांसाठी राज्य सरकारने मराठी भाषा अनिवार्य केली आहे. सरकारच्या या निर्णायाविरोधात चालकांमध्ये नाराजी आहे. त्या विरोधात मुंबईतील ऑटो-रिक्षा चालकांच्या एका गटाने सोमवारी आंदोलन करत तीन दिवसांचा संप सुरू केला आहे. मराठी न बोलणाऱ्या चालकांचे म्हणणे आहे की, या निर्देशामुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडेल.

मराठी भाषा येणे अनिवार्य असल्याच्या विरोधात चालकांनी कांदिवली लिंक रोडवर रस्ता अडवला. आंदोलकांच्या मते, अनेक ज्येष्ठ चालकांचे औपचारिक शिक्षण खूप कमी आहे. अथवा अजिबात झालेले नाही. भाषेची अट पूर्ण करण्यासाठी त्यांना अडचणी येत आहेत. 'आमचं वय ५५-६० वर्षांचं आहे. आम्ही कधी शाळेत गेलो नाही. आम्ही मराठी कशी बोलणार? जर आम्ही शिकलो असतो, तर आज ऑफिसमध्ये बसलो असतो, असे एका चालकाने सांगितले.

एका रिक्षा चालकाने सांगितले की, अनेक आंदोलक तुटक मराठी शिकण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना नियमांचे पालन करण्यासाठी वेळ देण्याऐवजी दंड आकारला जात होता. आम्ही दंड म्हणून १५,०००-२०,००० रुपये भरू शकतो का? जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हा तीन दिवसांचा संप ठेवणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajma Vs Chole : राजमा की छोले? प्रोटीनसाठी कोण ठरतंय भारी? उत्तर जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Abhijeet Dipke : अभिजित दीपकेंवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजी पार्क परिसरातील आंदोलन भोवणारं

Maharashtra News Live Update: वर्धामधील आर्वी येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

Black Sesame vs White Sesame: काळे तीळ की पांढरे तीळ? आरोग्यासाठी कोणते अधिक फायदेशीर? जाणून घ्या फरक

Uddhav Thackeray : ज्ञानेश कुमार म्हणजे अडाणी कुमार, उद्धव ठाकरेंचा घणाघात; पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT