Mumbai antop hill crime news Saam Tv News
मुंबई/पुणे

भावंडं खेळत होती, नराधमानं बागेत नेलं, १० वर्षीय चिमुकलीचे लचके तोडले; मुंबईत खळबळ

Mumbai antop hill crime news: मुंबईतील अँटॉप परिसरातील बागेत एका १० वर्षीय चिमुकलीवर नराधमकाकडून अत्याचार करण्यात आला. आरोपीला अटक. परिसरात खळबळ.

Bhagyashree Kamble

मुंबईत माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका १० वर्षीय चिमुकलीवर बागेत लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकीही देण्यात आलीये. ही धक्कादायक घटना अँटॉप हिल परिसरात घडली आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नराधमाला अटकही करण्यात आली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संतापजनक घटना मुंबईतील अँटॉप हिल परिसरात घडली. चिमुकली त्याच परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. १० वर्षांची चिमुकली घराजवळ तिच्या भावासोबत घरातील परिसरात खेळत होती. दरम्यान, खेळत असताना आरोपी त्यांच्याजवळ पोहोचला. नंतर त्यानं दोघांना बागेत नेलं.

बागेत गेल्यानंतर, आरोपीनं मुलीच्या भावाला काही जेवण आणण्यासाठी पाठवले. नंतर मुलीवर अत्याचार केला. तिच्यावर जबरदस्ती केली. या घटनेबद्दल कुणालाही सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली. नंतर पीडित चिमुकली आपल्या घरी गेली.

नंतर मुलीनं आईकडे धाव घेत आपबिती सांगितली. पीडित मुलीच्या आईला घटनेची माहिती मिळताच तिच्या पायाखालची वाळू सरकली. तिनं थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, ही संपूर्ण घटना २० जुलै ते २६ जुलै दरम्यान घडली. तक्रारीनंतर पोलिसांनी एक पथक पाठवून आरोपीला अटक केली.

चौकशीदरम्यान, आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेची माहिती परिसरात पसरताच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT