Mumbai Andheri Police Station  AI Image
मुंबई/पुणे

Mumbai : वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदलीनंतर पोलीस ठाण्यात फटाके फोडले! महिला कर्मचाऱ्याच्या कृतीने चर्चांना उधाण

Mumbai Andheri Police News : मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंदर यांच्या बदलीनंतर महिला पोलीस कर्मचाऱ्याने फटाके फोडून आनंद साजरा केल्याची घटना समोर आली आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याने फटाके फोडून आनंद साजरा केला

  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंदर यांची विशेष शाखा-१ मध्ये बदली करण्यात आली

  • बदलीनंतर मंगळवारी फटाके फोडल्याचा प्रकार घडल्याची माहिती

  • या घटनेचे दृश्य पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

संजय गडदे, मुंबई

मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात सध्या ट्रान्सफर सेलिब्रेशनची जोरदार चर्चा सुरू आहे. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंदर यांची बदली होताच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने चक्क पोलीस ठाण्याच्या आवारात फटाके फोडून आनंद साजरा केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी घडलेल्या या प्रकाराचे दृश्य पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती मिळत आहे. फटाके फोडल्याने पोलीस विभागात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कर्मचारी आणि वरिष्ठ निरीक्षक यांच्यात यापूर्वीपासून वाद असल्याचेही सांगितले जात आहे. या महिला कर्मचाऱ्याने मचिंदर यांना कारवाई केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंदर यांची बदली देखील संबंधित महिलेच्या तक्रारीवरून झाल्याचे म्हटले जात आहे. एवढेच नाही, तर तिच्यावर कारवाई केल्यास अंधेरी पोलीस ठाण्यातील अन्य सहा कर्मचाऱ्यांच्याही बदल्या घडवून आणू, असे तिने म्हटल्याचा दावा काही पोलिसांनी केला आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, संबंधित महिला कर्मचारी नियमित काम आणि सुरक्षा ड्युटी करण्यास टाळाटाळ करत होती. तिला काम दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली जात असल्याचाही आरोप आहे. तसेच, आपले पती आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून ती इतर कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान, १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीनंतर मचिंदर यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. सार्वजनिक हित, कायदा व सुव्यवस्था आणि प्रशासकीय गरजा ही बदलीमागील अधिकृत कारणे सांगण्यात आली आहेत. मात्र, या बदलीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महिला कर्मचाऱ्याने वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई झाल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे, आपली बाजू ऐकून न घेताच बदली करण्यात आल्याचे मचिंदर यांनी म्हटले आहे. अंधेरी पोलीस ठाण्यात मचिंदर यांनी १८ महिने काम केले होते. त्यांच्या जागी अजय कुलकर्णी यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस विभागातील अंतर्गत वाद आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचा विषय चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा तूर्तास रद्द; १२ डिसेंबरला शरद पवारांच्या हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन

किचनमध्ये कांदे आणि बटाटे एकत्र ठेवावे की नाही?

Kitchen Tips : वाटाणे सोलण्याची कटकट आता विसरा! फक्त 3 मिनिटांत होतील वाटाणे सोलून,पाहा भन्नाट ट्रिक

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? महत्वाची अपडेट समोर

Election: मोठी बातमी! काँग्रेसकडून भाजपचा दारूण पराभव,पंचायत समितीच्या ५१ जागांवर विजयी

SCROLL FOR NEXT