Andhri Fire Saam tv
मुंबई/पुणे

Andhri Fire: अंधेरीत इमारतीच्या १२ व्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे ४ अग्निबंब घटनास्थळी

Mumbai Andheri Fire News: अंधेरीत एका बहुमजली इमारतीच्या बाराव्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, मुंबई

Mumbai Andheri Fire :

मुंबई शहरात आगीच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या आठवडाभरापासून मुंबईच्या विविध भागात आगीच्या ६ पेक्षा अधिक आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. आज बुधवारी रात्री अंधेरीत एका बहुमजली इमारतीच्या बाराव्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. (Latest Marathi News)

इमारतीला भीषण आग

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील शहाजीराजे क्रीडा संकुलासमोरील पर्ल रेसिडेन्सी या इमारतीला आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. बुधवारी रात्री सवा आठ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे.

इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या चार गाड्या, अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी, डी एन नगर पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अग्निशमन दलाच्या जवानांकडून इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. इमारतीत काही नागरिक अडकल्याची भीती देखील या ठिकाणी व्यक्त केली जात आहे.

अंबरनाथमध्ये धावत्या कारला अचानक आग

अंबरनाथमधील बदलापूर-शिळफाटा रोडवर मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास धावत्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत चार प्रवासी थोडक्यात बचावले. बदलापूर येथून कार अंबरनाथ शहराजवळील आनंद नगर बीट पोलीस चौकीजवळ धावत्या कारला ही आग लागली. या घटनेत कार जळून खाक झाली. या घटनेमुळे बदलापूर शिळफाटा रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Recovery: हार्ट अटॅकनंतर कोणता व्यायाम सुरक्षित? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला...

Today Horoscope : आज 'या' ३ राशींना होणार फायदाच फायदा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय आहे खास?

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

SCROLL FOR NEXT