Mumbai News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News : मुंबई विमानतळावर मोठी कारवाई, तब्बल 25 कोटींचे अमली पदार्थ जप्त

साबणाच्या वडीत लपवून कोकेनेची तस्करी करण्यात येत होती.

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन गाड

मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने म्हणजेच DRI ने मुंबई विमानतळावर एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मुंबई आंतररष्ट्रीय विमानतळावरून तब्बल २५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. साबणाच्या वडीत लपवून कोकेनेची तस्करी करण्यात येत होती. (Mumbai News)

DRI ला गुप्त माहिती मिळाली होती की, सोमवारी पहाटे अदिस अबाबा येथून येणारा प्रवाशी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सोबत घेऊन येत आहे, हा प्रवासी मुंबई विमातळावर उतरताच त्याला DRI ने ताब्यात घेतलं त्याच्या सामानाची झडती घेतली असता त्यातून १२ साबणाच्या वड्या जप्त करण्यात आल्या. (Latest News)

यावेळी या वड्यांची पाहणी केली असता त्यातूनच अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचं उघड झालं. यावेळी एकूण २.५८ किलो कोकेन जप्त करण्यात आल आहे. याची किंमत जवळपास २५ कोटी रुपये आहे. अमली पदार्थांची डिलिव्हरी घेण्यासाठी आलेल्या इसमाला देखील DRI ने सापळा रचून अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT