Bombay High Court On Mumbai Air Pollution and on Fire Crackers HC on Fire Crackers - Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Air Pollution: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! दिवाळीत फक्त 3 तास फटाके फोडता येणार, वाचा सविस्तर

Satish Kengar

Bombay High Court On Mumbai Air Pollution:

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईत आवाज करणारे फटाके वाजवण्यास सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी, असं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे. यासोबतच नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत.

मुंबईतील वायू प्रदूषणाच्या पार्श्वभुमीवर हायकोर्टाने हे निर्देश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली आणि मुंबईतील वायू प्रदूषणाशी संबंधित रिपोर्ट्स येत आहेत. ज्यात या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत चालली असल्याचं सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर हायकोर्टाने या सूचना केल्या आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिवाळीपर्यंत मुंबईतील सर्व बांधकामे राहणार बंद

मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे की, ''विकासकामांपेक्षा लोकांचे जीवन महत्त्वाचे आहे. काही दिवस बांधकाम थांबवले तर स्वर्ग कोसळणार नाही.'' राज्य सरकार आणि बीएमसीच्या वकिलांनी केलेल्या आवाहनानंतर हायकोर्टाने सांगितले की, आम्ही पुढील चार दिवस हवेच्या गुणवत्ता निर्देशांकावर लक्ष ठेवू. चार दिवसांनंतरही AQI कमी न झाल्यास पुढील चार दिवस सर्व विकासकामे थांबवण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. (Latest Marathi News)

दरम्यान, बीएमसीला मुंबईतील 6,000 हून अधिक बांधकाम साइट्सवर प्रदूषण होत असल्याचं आढळलं आहे. यानंतर त्यांना 20 ऑक्टोबर रोजी वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामध्ये अँटी स्मॉग गन, बांधकामाच्या ठिकाणी फवारणी, दररोज पुनर्वापर केलेल्या पाण्याने सर्व 650 किमी प्रमुख रस्ते स्वच्छ करणे इत्यादींचा समावेश आहे.

स्थानिक मंडळाच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, मुंबईतील 78 टक्के घरांमध्ये किमान एक व्यक्ती वायू प्रदूषणाशी संबंधित आजारांनी ग्रस्त आहे. वायू प्रदूषणामुळे 44 टक्के लोकांनी डोळ्यात जळजळ होत असल्याचं सांगितलं आहे. या आजारांसाठी 85 टक्के लोकांनी बांधकाम साइटला दोष दिला आणि 62 टक्के लोकांनी वाहन उत्सर्जनाला दोष दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT