flight emergency landing  Saam tv
मुंबई/पुणे

मुंबईहून १६६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड; भोपाळमध्ये केलं एमर्जन्सी लँडिग

Flight Emergency Landing : मुंबईहून १६६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे. या विमानाचं भोपाळमध्ये एमर्जन्सी लँडिग करण्यात आलं आहे.

Vishal Gangurde

देशात आठवड्याभरात आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड

तांत्रिक बिघाडानंतर विमानाचं सुरक्षितरित्या लँडिंग

पायलटच्या योग्य निर्णयाने १७५ जण सुरक्षित

मध्य प्रदेशच्या राजधानी भोपाळमधून मोठी बातमी हाती आली आहे. मुंबईहून निघालेल्या एअर इंडियाच्या प्लाइट AI63 मध्ये संशयास्पद तांत्रिक बिघाडानंतर विमानाचं एमर्जन्सी लँडिग करण्यात आलं आहे. विमान सुरक्षितरित्या भोपाळच्या विमानतळावर लँडिंग करण्यात आलं आहे.

विमानात एकूण १७५ जण होते. यात १६६ प्रवाशांचा समावेश आहे. तर ९ क्रू मेंबर आहेत. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आलं. मुंबईतून विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळात तांत्रिक बिघाड झाला. सध्या परिस्थिती पुन्हा नियंत्रणात आहे.

एअर इंडियाच्या माहितीनुसार, विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे संकेत मिळाल्यानंतर पायलटने तातडीने SOP अंतर्गत निर्णय घेतला. याच वेळेत मोठा अपघात टाळण्याचा अवधी असतो. यासाठी पायलट आणि ट्रॅफिक कंट्रोलसोबत समन्वय असणे गरजेचे असते. पायलटच्या निर्णयामुळे १७५ जण सुरक्षित असून मोठी दुर्घटना टळली आहे.

वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, फ्लाइट AI633 ने उड्डाण केल्यानंतर एअर ट्राफिकच्या कंट्रोलमध्ये तांत्रिक बिघाडाची समस्या जाणवली. त्यानंतर तातडीने प्रोटोकोल लागू करण्यात आला. या प्रोटोकोलनुसार, लँडिंगची तयारी सुरू करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा देखील घटनास्थळी पोहोचल्या. एटीसी, एअरलाइन ग्राऊंड स्टाफ, सीआयएसएफ आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्व स्थिती सांभाळून घेतली.

तत्पूर्वी, काही आठवड्यांपूर्वी पुण्यातील पुरंदर तालुक्यात छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टर हे पार्किंगमध्ये लँडिंग करण्यात आलं होतं. त्यांच्या हेलिकॉप्टरच्या पायलटने हेलिपॅडऐवजी पार्किंगच्या जागेत लँडिंग केल्याने खळबळ उडाली होती. या घटनेमुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये वाढत्या बिघाडाच्या घटनेमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT