Mumbai Ahmedabad Bullet Train Project Update | BKC & Surat Stations AI Image
मुंबई/पुणे

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग; BKC आणि सूरत स्टेशनचे बांधकाम अंतिम टप्प्यात

Mumbai Ahemdabad Bullet Train News : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग आला असून BKC आणि सूरत स्थानकांचे काम प्रगतिपथावर आहे. सूरत-वापी मार्गावर ऑगस्ट २०२७ मध्ये पहिली सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.

Alisha Khedekar

  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या 508 किमी कॉरिडॉरच्या कामाला वेग

  • BKC स्थानकाच काम वेगाने सुरु

  • सूरत स्थानकाचे मुख्य स्ट्रक्चरल आणि रूफिंगचे काम पूर्ण

  • सूरत-वापी दरम्यान पहिली बुलेट ट्रेन सेवा ऑगस्ट 2027 मध्ये सुरू

मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. या 508 किलोमीटर लांबीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि सूरत रेल्वे स्थानकांवर सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. सूरतमधील स्थानकाचे मुख्य बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून आता इंटीरियर फिनिशिंगचे काम सुरू आहे. तर मुंबईतील BKC स्थानकाच्या भूमिगत बांधकामालाही वेग आला आहे.

मुंबईतील BKC स्थानक हे मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉरचे सुरुवातीचे स्थानक असणार आहे. हे स्थानक जमिनीपासून सुमारे ३० मीटर खोलीवर उभारले जात आहे. सध्या येथे मोठ्या प्रमाणावर खोदकाम, फाउंडेशन आणि भूमिगत कामे सुरू असून त्यातील काही कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.

सूरत स्टेशनला डायमंड सिटीची झलक

सूरत स्थानकाच्या स्ट्रक्चरल आणि रूफिंगचे काम पूर्ण झाले आहे. आता स्थानकातील अंतर्गत सजावट आणि फिनिशिंगवर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे, या स्थानकाच्या डिझाइनमध्ये सूरतच्या प्रसिद्ध हिरे उद्योगाची झलक पाहायला मिळणार आहे. स्थानकातील छत, जिने, प्लॅटफॉर्म आणि ट्रॅकशी संबंधित कामेही सुरू आहेत. स्थानकावर ‘सूरत’ असा साइनबोर्डही लावण्यात आला आहे. या कॉरिडॉरवर बुलेट ट्रेनची कमाल वेगमर्यादा 320 किलोमीटर प्रतितास असणार आहे. त्यामुळे मुंबई, गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी हा प्रकल्प वाहतुकीच्या दृष्टीने मोठा बदल घडवून आणण्याची शक्यता आहे.

2027 मध्ये पहिली सेवा सुरू होणार

रेल मंत्रालयाच्या माहितीनुसार, प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सूरत ते वापी दरम्यान बुलेट ट्रेन सेवा ऑगस्ट 2027 मध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, भारताने स्वदेशी हाय-स्पीड ट्रेन विकसित करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. या स्वदेशी ट्रेनला ‘B28’ असे नाव देण्यात आले असून तिचा वेग 280 किलोमीटर प्रतितास असणार आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्प 2026-27 मध्ये आणखी सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा केली आहे. यामध्ये मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद, हैदराबाद-बेंगळुरू, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बेंगळुरू, दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलीगुडी या मार्गांचा समावेश आहे. त्यामुळे देशातील हाय-स्पीड रेल्वेचे जाळे भविष्यात आणखी विस्तारण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भीषण अपघात! बस उलटल्याने 12 प्रवाशांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Maharashtra News Live Update: मंत्री येणार म्हणून घाईघाईत काम, चाकण तळेगाव रोडवर एका तासातच कामाचा बोजवारा

LPG e-KYC Deadline: LPG e-KYC ची शेवटची तारिख डेटलाइन वाढणार का?

Tv Actress Puja Banerjee: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी चिमुकलीचं आगमन; शेअर केला लेकीचा पहिला फोटो

Actress Injured: लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान प्रसिद्ध गायिकेवर हल्ला; चेहऱ्यावर गंभीर दुखापत

SCROLL FOR NEXT