Mumbai Accused Escaped Saam Tv
मुंबई/पुणे

Accused Escaped: चोरीच्या गुन्ह्यात अटक, मग वैद्यकिय तपासणीसाठी रुग्णालयात नेलं, गर्दीचा फायदा घेत आरोपीचं पलायन

नदीमला चोरीच्या गुन्ह्यात वडाळा टीटी पोलिसांनी अटक (Arrest) केली होती.

सुरज सावंत

मुंबई: मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात वैद्यकिय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने गर्दीचा फायदा घेत पळ काढल्याची घटना समोर आली आहे. नदीम अलिशान खान उर्फ रिहान असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Mumbai Accused escape from KEM hospital by taking advantage of the crowd).

चोरीच्या गुन्ह्याखाली अटक

नदीमला चोरीच्या गुन्ह्यात वडाळा टीटी पोलिसांनी अटक (Arrest) केली होती. वैद्यकिय चाचणीसाठी नदीमला परळच्या के.ई.एम रुग्णालयात (KEM Hospital) आणले होते. रुग्णालयात ओपीडीत गर्दीचा फायदा घेत नदीमने पोलिसांना धककाबुक्की करुन पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून आरोपीचा शोध सुरु आहे.

जामीन मिळवून देतो असं सांगत पोलिसाची आरोपीकडे 50 लाखांची मागणी

दुसरीकडे, मुंबईच्या (Mumbai) चेंबूर पोलीस ठाण्यात आरोपीकडे खंडणी मागितल्या प्रकरणी एक पोलीस अधिकारी, एक निलंबित पोलीस अधिकारी आणि अन्य एकावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलंबित पोलीस अधिकारी अनिलने आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी 50 लाखांची खंडणी मागितली होती. तर सोनटक्केने आरोपीकडे 2 लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR Filed) करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT