Mumbai Water Stock Reaches 93.80 Percent | Seven Lakes Update AI Image
मुंबई/पुणे

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

Mumbai Water Storage News : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमध्ये 13,57,667 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला असून जलसाठा 93.80 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईतील सातही प्रमुख तलावांमध्ये 13,57,667 दशलक्ष लिटर पाणीसाठा

  • एकूण उपयुक्त जलसाठा 93.80 टक्क्यांवर

  • विहार, तुळशी आणि मोडक सागर तलाव 100 टक्के भरले

  • यंदाचा साठा 18 ऑगस्ट 2025 च्या तुलनेत अधिक

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. आजच्या आकडेवारीनुसार, सातही तलावांमध्ये मिळून 13,57,667 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. हा साठा एकूण उपयुक्त जलसाठ्याच्या 93.80 टक्के इतका आहे. त्यामुळे आगामी काळातील मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबत मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी विहार, तुळशी आणि मोडक सागर हे तीन तलाव 100 टक्के भरले आहेत. तानसा तलावात 99.58 टक्के, मध्य वैतरणामध्ये 97.11 टक्के, भातसा तलावात 92.84 टक्के, तर अप्पर वैतरणामध्ये 85.82 टक्के पाणीसाठा आहे. तलावनिहाय पाणीसाठा पाहता, अप्पर वैतरणामध्ये 1,94,854 दशलक्ष लिटर, मोडक सागरमध्ये 1,28,925 दशलक्ष लिटर, तानसामध्ये 1,44,475 दशलक्ष लिटर, मध्य वैतरणामध्ये 1,87,937 दशलक्ष लिटर आणि भातसा तलावात सर्वाधिक 6,65,732 दशलक्ष लिटर पाणी आहे. विहारमध्ये 27,698 तर तुळशीमध्ये 8,046 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांत तलावांच्या पाणलोट क्षेत्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मोडक सागर येथे सर्वाधिक 54 मिमी पावसाची नोंद झाली. अप्पर वैतरणा येथे 52 मिमी, मध्य वैतरणा 51 मिमी, तानसा 46 मिमी, भातसा 20 मिमी, तुळशी 16 मिमी आणि विहार येथे 29 मिमी पाऊस झाला. विहार तलाव 7 जुलैपासून ओसंडून वाहत आहे.

तानसा धरणातूनही काही दिवस पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, सध्या परिस्थितीत काहीसा बदल झाला असून मध्य वैतरणा डब्ल्यूएससीपीओ गेट बंद आहे. तसेच अप्पर वैतरणामधून 6 जुलैपासून पाण्याचा विसर्ग बंद ठेवण्यात आला आहे. एकूणच, सातही तलावांमध्ये 93 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असल्याने मुंबईच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने यंदाची स्थिती दिलासादायक असल्याचे चित्र आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक..

दुष्काळात शेतकरी संकटात, पण ‘गोकुळ’च्या ठरावधारकांची चंगळ; एका ठरावासाठी लाखाची बोली?

Makeup Powder: मेकअप पावडर निवडताना गोंधळ होतोय? तुमच्या स्किन टाइपनुसार अशी निवडा परफेक्ट पावडर

Milk tea: एकदा बनवलेला चहा किती तासांनी खराब होतो?

भाजपच्या दिग्गज महिला नेत्याचे होणार पुनरागमन; मोदी मंत्रिमंडळात वर्णी लागणार? घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT