Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking : ६ वर्षांचा मुलगा जेवला नाही, भडकलेल्या बापाने कुत्र्याच्या पट्ट्याने मारलं; मुंबईतील धक्कादायक प्रकार

Mumbai Andheri Crime News : मुंबईतील अंधेरी भागात जेवण न केल्यामुळे वडिलांनी ६ वर्षांच्या मुलावर वायर आणि कुत्र्याच्या पट्ट्याने अमानुष मारहाण केली असून आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • अंधेरीत सहा वर्षांच्या मुलावर निर्दयी वडिलांची मारहाण

  • जेवण न केल्याच्या क्षुल्लक कारणावरून मारहाण

  • आईने पाहताच पोलिसांत तक्रार दाखल केली

  • आरोपी वडिलांना अटक; मुलगा गंभीर जखमी

आई वडील मुलांवर जितकं प्रेम करतात तितकंच त्यांना शिस्त लावण्यासाठी रागवतात. मात्र हा राग क्रूरतेत बदलला तर एखादी चुकीची घटना घडू शकते. अशीच एक घटना मुंबईतील अंधेरीत घडली आहे. एका सहा वर्षांच्या मुलाने जेवण्यास नकार दिल्याने त्याच्या वडिलांनी त्याला क्रूरपणे मारहाण केली. या घटनेनंतर वायर आणि कुत्र्याच्या पट्ट्याने मारहाण केल्यामुळे मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मुलाच्या आईने त्याच्या वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली असून वडिलांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी भागातील सहार गावात युवराज कथुरे, त्याची पत्नी निशी (२७) आणि त्यांच्या मुलासह राहतो. युवराज हा फॅब्रिकेशनचे काम करतो. निशी आणि युवराजमध्ये किरकोळ कारणांवरून वारंवार वाद होत असत. काही दिवसांपूर्वी, युवराजने एका क्षुल्लक कारणावरून भांडण केले, निशीवर हल्ला केला आणि तिला घराबाहेर काढले. युवराजने तिला धमकी दिली की जर तिने त्यांच्या मुलाला सोबत नेले तर तो तिला मारून टाकेल. त्यानंतर ती तिच्या आईसोबत राहायला गेली.

२५ नोव्हेंबर रोजी युवराजने तिला व्हिडिओ कॉल केला आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलाच्या शरीरावरील जखमा दाखवल्या. तिने त्याला विचारले की त्याने त्यांच्या मुलाला का मारहाण केली, तेव्हा त्याने कॉल कट केला. मुलाची अवस्था बघून निशी ताबडतोब सहारगाव येथील त्यांच्या घरी गेली. तिथे गेल्यावर घराला कुलूप असल्याचे पाहून तिने तिच्या मुलाचा शोध सुरू केला. नंतर तो परिसरातील एका महिलेसोबत सापडला.

मुलगा सापडल्यानंतर निशीला मुलाच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा दिसल्या. जेव्हा तिने त्याला काय झाले? असे विचारले तेव्हा त्याने सांगितले की, तो जेवला नाही म्हणून, त्याच्या वडिलांनी त्याला आधी तारेने आणि नंतर कुत्र्याच्या पट्ट्याने मारहाण केली. मुलाने असेही सांगितले की त्याचे वडील नंतर घर सोडून निघून गेले. मुलाची अवस्था पाहून घाबरलेल्या निशीने थेट पोलीस ठाणे गाठत क्रूर वडिलांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात युवराजला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Problems: काही लोक अंथरुणात पडताच गाढ झोपतात, पण काहींना झोपच लागत नाही, कारण...?

CNG Rates Today : सर्वसामान्यांना महागाईचा फटका! CNG च्या दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार? वाचा

Maharashtra News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते १५ नोव्हेंबरला 'पुणे रन फॉर युनिटी २०२६'चा फ्लॅग ऑफ

India Bloc Rally: ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा एल्गार, दिल्लीत आज महामोर्चा; रामलीला मैदानाला छावणीचे स्वरूप, १०००० पोलिस तैनात

Mumble In Sleep : तुम्हीही झोपेत बडबडता का? शरीर देतंय 'या' गंभीर आजाराचा संकेत, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT