Mumbai Police News / File Photo SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Shocking News : वरळीत पोलिसाची आत्महत्या; प्रेयसीसोबत भांडण झाल्यानंतर मेसेज आणि फोटो पाठवून उचललं टोकाचं पाऊल

Mumbai Police News : मुंबईतील वरळीत पोलीस शिपायानं आत्महत्या केली. प्रेयसीसोबत भांडण झाल्यानंतर त्याने हे टोकाचं पाऊल उचललं.

सूरज सावंत

Mumbai Police News :

मुंबईतील वरळीत धक्कादायक घटना घडली. प्रेयसीसोबत भांडण झाल्यानंतर पोलीस शिपायानं आत्महत्या केली. प्रेयसीला मेसेज आणि फोटो पाठवून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रजित साळुंखे (वय २७) असं आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचं नाव आहे. तो एलए विभाग १ मध्ये कार्यरत होता. रविवारी रात्री वरळीच्या जलतरण तलावाजवळील लोखंडी ग्रीलला गळफास घेऊन त्यानं जीवनयात्रा संपवली. प्रेयसीसोबत भांडण झाल्यानं त्यानं हे कृत्य केलं.

इंद्रजितचे त्याच्या प्रेयसीसोबत भांडण झाले होते. त्यानंतर त्यानं तिला दादरला सोडले. तेथून तो वरळीला आला. तेथून त्याने प्रेयसीला आत्महत्या करत असल्याचा मेसेज आणि फोटो पाठवला. त्यानंतर त्यानं हे पाऊल उचललं. या घटनेची नोंद वरळी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT