Amit Thackeray News Saam tv
मुंबई/पुणे

MNS News: मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरुन मनसे आक्रमक! अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढणार

Mumbai Goa Highwayचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनसेकडून २३ ते ३० ऑगस्ट रोजी मुंबई गोवा महामार्गावर पदयात्रा काढण्यात येणार आहे.

Gangappa Pujari

रुपाली बडवे, प्रतिनिधी...

MNS News: गेल्या १२-१३ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. महामार्ग पूर्ण होऊन सुलभ प्रवास करता यावा याकरता राज ठाकरेंकडून निर्धार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. या प्रकरणात आता मनसेने आक्रमक भूमिका घेत अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढली जाणार असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या (Mumbai Goa Highway) मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आक्रमक भूमिका घेतली आहे. या महामार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनसेकडून २३ ते ३० ऑगस्ट रोजी मुंबई गोवा महामार्गावर पदयात्रा काढण्यात येणार आहे. मनसे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येणार असून मनसे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत.

या पदयात्रेच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था जनता आणि शासनासमोर मांडण्यात येणार आहे. एकूण तीन टप्प्यात या पदयात्रेचे नियोजन करण्यात येणार असून पहिल्या दोन टप्प्यांमध्ये ही यात्रा चालत असेल आणि तिसऱ्या टप्प्यात गाव जनजागृती अभियान करण्यात येईल.

याबाबत बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ३ टप्प्यांमध्ये ही पदयात्रा काढणार असून जमिनी विकू नका असे आवाहन करत लोकांमध्ये जनजागृती आणि मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या पदयात्रेत लोकांनी सहभागी व्हावे.. असे आवाहनही संदीप देशपांडे यांनी केले.

दिपाली सय्यद यांच्यावर निशाणा...

दरम्यान, मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके आणि गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम हाती घ्यावी, अशी टीका शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी केली होती. यावरुन संदीप देशपांडे यांनी कोण दिपाली सय्यद? त्या कोणत्या पक्षात आहेत.. अशी खोचक टीका केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT