Mumbai Local Viral Video Saamtv
मुंबई/पुणे

Viral Video: Local मध्ये घुमतोय जादूई आवाज; तिच्या जिद्दीची कहाणी ऐकून कराल सलाम, पाहा VIDEO

या तरुणीचा आवाज तर सुंदर आहेच, पण तिच्या धडपडीमागची कथा ऐकुन तुम्हीही तिचे कौतुक कराल...

Gangappa Pujari

Mumbai Local Viral Video: सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग म्हणून ओळखले जाते. सोशल मीडियावर सध्या अनेक गोष्टी, नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. कच्चा बदाम गर्ल असो किंवा रेल्वे स्टेशनवर गाणी गाऊन लोकप्रिय झालेली रानू मंडल असो, अनेकांचे आयुष्य सोशल मीडियामुळे रातोरात बदलले आहे. (Viral Video)

सध्या मुंबई लोकलमधील अशाच एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही तरुणी लोकलमध्ये गाणे गाताना दिसत आहे, जिच्या आवाजाने प्रवासीही थक्क झालेले पाहायला मिळत आहेत, तिचा आवाज तर सुंदर आहेच, पण तिची धडपड ज्यामुळे चालू आहे ते कारण ऐकून नेटकरी तिचे कौतुक करत आहेत. काय आहे हे नेमकं प्रकरण, चला जाणून घेवू.

मुंबईच्या लोकलमध्ये (Mumbai Local) नेहमीच भांडणे, मारामाऱ्या, शिवीगाळ याबद्दलचे व्हिडिओ आपण पाहत असतो. पण सध्या एका वेगळ्याच व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुणी हातात माईक आणि साऊंड घेवून लोकलमध्ये गाणे गाताना दिसत आहे. जिच्या आवाजाने प्रवासीही मंत्रमुग्ध झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, या तरुणीने कॅन्सरवर मात केली आहे. आता कॅन्सरच्या रुग्णांसाठी तिने मुंबई लोकलमध्ये अनोखा उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे.

ही महिला रोज हातात माईक व मोठा स्पीकर घेऊन मुंबईच्या लोकलमध्ये चढते, गाणी गाऊन सर्वांचे मनोरंजन करते आणि यातून समोरच्याला परवडेल, इच्छा असेल इतक्या पैशांची मदत करण्यास सांगते. तिच्या आवाजाचा आणि हेतूचा गोडवा या व्हिडिओमध्ये दिसून येईल.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ती तरुणी एक प्यार का नगमा है गाणे गाताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून तिच्या आवाजाचे आणि प्रामणिकपणाचे नेटकरी तोंडभरुन कौतुक करताना दिसत आहेत.

या कमेंट्समध्ये अनेकांनी आम्ही या तरुणीला पाहिले असून तिचा आवाज खरंच खूप गोड आहे, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही जणांनी तिची दुसऱ्यांसाठीची धडपड पाहून तिचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha: पितृ पक्षात ४ ग्रह बदलणार रास; मेष, मिथुन सह अजून २ राशींचं नशीब फळफळणार

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

SCROLL FOR NEXT