रांजणगाव औद्योगिक वसाहतीत भरवस्तीत महावितरणच्या रोहित्राचा स्फोट... रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत भरवस्तीत महावितरणच्या रोहित्राचा स्फोट...

नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

रोहिदास गाडगे

पुणे - रांजणगाव औद्योगिक वसाहत असलेल्या सणसवाडीतील वसेवाडी लोकवस्तीत महावितरणच्या विद्युत रोहित्राचा रात्रीच्या सुमारास अचानक स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने जीवितहानी टळली मात्र रोहित्राच्या झालेल्या स्पोटमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

हे देखील पहा -

सणसवाडीतील भरवस्तीत असलेल्या या विद्युत रोहित्राचा अचानक स्फोट झाल्याने या परिसरात लावलेल्या दुचाकी आणि कारचेही नुकसान झाले परंतु सुदैवाने जवळच खेळणाऱ्या लहान मुलांना कुठली इजा झाली नाही. भरवस्तीतील विद्युत रोहित्र हे दुसरीकडे हलवावे या यासाठी स्थानिक नागरिकांकडून गेली अनेक दिवसांपासून महावितरणाशी पत्रव्यवहार सुरू होता.

परंतु महावितरणाने या कडे दुर्लक्ष केल्याने आणि महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे स्थानिक नागरिक सांगत असून येत्या काळात विद्युत रोहित्र भर वस्तीतून दुसरीकडे न हलविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अशोक खरात प्रकरणी थोड्याच वेळात नाशिक न्यायालयात सुनावणी

Maharashtra Politics: २५-३० आमदारांसह राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन होणार; राऊतांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Rate Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त; १० तोळ्यामागे १५,३०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Kapil Sharma: २० वर्षांच्या कारियरमध्ये केले फक्त ४ चित्रपट, एक हिट तीन फ्लॉप, तरीही आहे कोट्यवधींचा मालक

युद्ध भडकलं! इराणवर सर्वात मोठा हल्ला कधी होणार? ट्रम्प यांनी सांगितली तारीख

SCROLL FOR NEXT