msedcl contractual workers indefinite strike in kalyan saam tv
मुंबई/पुणे

Msedcl Contractual Workers Strike : कल्याणमध्ये वीज कंत्राटी कामगारांची एकजूट, बेमुदत काम बंद आंदोलनास प्रारंभ

Mahavitran News : कंत्राटी कामगारांना सरकारकडून वारंवार आश्वासन दिले जाते मात्र कृती समिती सोबत बैठका घेतल्या जात नाहीत असे कंत्राटी कामगारांनी म्हटले.

Siddharth Latkar

- अभिजीत देशमुख

Kalyan :

कल्याण शहरातील महावितरणच्या कार्यालया बाहेर (kalyan mahavitran office) वीज कंत्राटी कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. प्रलंबित मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा कंत्राटी कामगारांनी सरकारला दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कंत्राटी कामगारांच्या वेतनात 30 टक्के वाढ ,रोजनदारी कामगार पद्धती द्वारे शाश्वत रोजगार योजना, भरती प्रक्रियेत कंत्राटी कामगारांना सामावून घेणे त्यानंतर उर्वरित भरती प्रक्रिया करावी या प्रमुख मागण्यांसाठी महानिर्मिती, महावितरण व महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांनी कल्याण येथील महावितरण कार्यालया बाहेर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

कंत्राटी कामगारांना सरकारकडून वारंवार आश्वासन दिली जातात मात्र कृती समिती सोबत बैठका घेतल्या जात नाहीत, ठोस निर्णय घेतला जात नाही या निषेधार्थ महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन छेडले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने मनोज भानुशाली यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले. (Maharashtra News)

दरम्यान कंत्राटी कामगारांच्या या काम बंद आंदोलनामुळे महावितरणचे सेवा विस्कळीत होण्याची शक्यता असून सरकार याबाबत काय निर्णय घेते हे पाहणे देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : राज्यात पुढील काही दिवसांत धो धो पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान? वाचा

FDAची जुहूतील इस्कॉनच्या अन्न आस्थापनांवर मोठी कारवाई; 3 फूड युनिट्सचे परवाने निलंबित

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटलांची वैद्यकीय पथकाकडून तपासणी

Ayurveda Benefits : सर्दी-खोकला झटक्यात नाहीसा, डिप्रेशनवरही मात;जाणून घ्या 'या' आयुर्वेदिक वनस्पतींचे फायदे

Thursday Horoscope : गुरुवारी या 4 राशींचं नशीब चमकणार! पैशांसह करिअरमध्येही मिळणार मोठी खुशखबर; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT