एमपीएससी परीक्षांमधील गैरप्रकार, पेपरफुटी आणि भरतीतील विलंबाविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा मोर्चा झाला.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी विद्यार्थी प्रतिनिधींना नोटीस पाठवली आहे.
ओंकारेश्वर ब्रिज ते जिल्हाधिकारी कार्यालय असा विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता.
सचिन जाधव, साम प्रतिनिधी
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पोलीस अलर्ट झालेले आहेत. आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. आंदोलनाच्या आधीच विद्यार्थ्यांना पुणे पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे. यामळे एमपीएससी च आंदोलक विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक झालेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमध्ये वारंवार होणारे गैरप्रकार, पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील विलंबाविरोधात एमपीएससीची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी पुण्यात मोठा मोर्चा सोमवारी काढला होता.
एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतील गैरप्रकार अलीकडेच उघडकीस आला. सरकारी नोकरीचं स्वप्न घेऊन वर्षानुवर्षे अभ्यास करून अशा प्रकारे हिरमोड झाल्यानंतर हजारो तरुणांचा संताप झाला असून त्यांनी पुण्याच्या रस्तावर उतरून आपला रोष व्यक्त केला होता. दोन दिवसापूर्वी पुण्यातल्या ओंकारश्वर ब्रिज ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एमपीएससी विद्यार्थ्यांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी मोर्चा काढला होता.
या मोर्च्याच्या संदर्भात राज्य सरकारला त्यांनी तीन दिवसाचा कालावधी जो आहे तो मागितला होता. आता तीन दिवसानंतर जर मागण्या मान्य नाही झाल्या तर तीव्र आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला होता, मात्र तत्पूर्वीच पुणे पोलिसांकडून विद्यार्थी प्रतिनिधींना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थ्यांनी पुण्यात 7 तारखेला हे आंदोलन केले होते.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी सरकारला योग्य उपाय योजनेसाठी तीन दिवसांची मुदत दिली होती. सरकारला दिलेली आज 10 तारखेला संपलीय. जर तीन दिवसात सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थ्यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस जे आहे ते अलर्ट मोडवर आलेले आहेत. पोलिसांनी विद्यार्थ्यांना नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे यावर आता एमपीएससी विद्यार्थी आणि संघटनांची काय भूमिका असेल हे पाहण महत्वाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.