MPSC Student Protest Pune:  Pune News
मुंबई/पुणे

VIDEO: MPSC आंदोलनात मोठा गोंधळ! विद्यार्थी- पोलिसांची बाचाबाची, प्रचंड गर्दीने वाहतूक ठप्प, पुण्यात काय घडतयं?

MPSC Student Protest Pune: पुण्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवल्याने विद्यार्थी आक्रमक झाले असून या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.

Gangappa Pujari

पुणे, ता. २२ ऑगस्ट २०२४

पुण्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवल्याने विद्यार्थी आक्रमक झाले असून या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस असून आंदोलक विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केल्याने रस्ते झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्याने आंदोलक- पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.

MPSC आंदोलनात गोंधळ!

पुण्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे २५ तारखेची परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. नवीपेठेतील शास्त्री रोडवर हे आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, रुपालीताई पाटीलही या आंदोलनात सहभागी आहेत.

पोलीस आंदोलकांची बाचाबाची!

आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थी आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलक विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केल्याने परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु आंदोलक विद्यार्थी सहकार्य करत नसल्याने पोलीस- आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाजी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आंदोलकांनी पोलिसांशी हुज्जतही घातली.

दरम्यान, MPSC कृषी व IBPS विषयात आताच बैठक झाली. मा. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मी स्वतः या बैठकीस उपस्थित होतो. महाराष्ट्र शासनाने लोकसेवा आयोगाला कृषीच्या 258 पदांचा समावेश करावा अशी अधिकृतपणे विनंती केली आहे. तसेच IBPS परीक्षा देखील 25 ऑगस्ट रोजी असल्याने MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. लवकरच निर्णय अपेक्षित आहे. यासोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात आयोगाची बैठक सुरू झालेली आहे. अशी माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earthquake : मणिपूरला भूकंपाचे हादरे! ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Gold Rate Today: खुशखबर! चांदी ₹१०,०००नी स्वस्त ! सोन्याचे दर किती? वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Periods Mental Health : पीरियड्समध्ये न चुकता करा 'ही' कामे, चिडचिड अन् मूड स्विंग्स होणारच नाही

Who Is Rajnandini Pawar: महाराष्ट्राची कन्या देशात ठरली सर्वात सुंदर! कोण आहे राजनंदिनी पवार? 'मिस इंडिया 2026' ची उपविजेती

Bhendwal Bhavishyvani: यावर्षी पाऊस कसा राहिल? शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा; देशावर आर्थिक संकट, वाचा भेंडवळच्या घटमांडणीचा A टू Z अंदाज

SCROLL FOR NEXT