Shinde-Fadnavis Government SAAM TV
मुंबई/पुणे

MPSC चे नवीन नियम 2025 पासून लागू होणार? शिंदे-फडणवीस सरकारकडून विद्यार्थ्यांना दिलासा

एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

MPSC News : एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतर मंत्र्यांनी हे 'एमपीएससी'चे नवीन नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली. त्यानंतर 'एमपीएससी'चे नवीन नियम 2025 पासून लागू करण्याला तत्वत: मान्यता मुख्यमंत्र्यांकडून मिळाली आहे. या घेतलेल्या निर्णयाबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

यूपीएससीच्या धर्तीवर नवीन अभ्यासक्रम यावर्षी लागू न करता , त्या जागी 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन केलं होतं. अलका टॉकीज चौकात या एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त होता.

१३ जानेवारी रोजी या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर आज या विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन केले. या आंदोलनाच्या ठिकाणी भाजप नेते अभिमन्यू पवार आणि गोपीचंद पडळकर उपस्थित होते. गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले होते.

त्यानंतर आज, देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर 'एमपीएससी'चे नवीन नियम 2025 पासून लागू करण्याला तत्वत: मान्यता मुख्यमंत्र्यांकडून मिळाली आहे. शिंदे सरकारकडून या निर्णयाबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT