MPSC परीक्षार्थी व कर्मचाऱ्यांना 2 दिवस लोकल ट्रेनची मुभा द्यावी- राज्याचे रेल्वेला पत्र
MPSC परीक्षार्थी व कर्मचाऱ्यांना 2 दिवस लोकल ट्रेनची मुभा द्यावी- राज्याचे रेल्वेला पत्र Saam Tv
मुंबई/पुणे

MPSC परीक्षार्थी व कर्मचाऱ्यांना 2 दिवस लोकल ट्रेनची मुभा द्यावी- राज्याचे रेल्वेला पत्र

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येणार असून परीक्षार्थी तसेच परीक्षा घेण्याच्या कामासाठी प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ३० व ३१ ऑक्टोबरला लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी असे पत्र राज्य शासनातर्फे रेल्वे विभागाला देण्यात आले आहे. (MPSC examinees and staff should be allowed 2 days local train - letter to railways from state)

हे देखील पहा -

राज्य शासनाकडून मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेच्या विभागीय प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रात परीक्षार्थी, पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी व कर्मचारी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) च्या परीक्षेसाठी प्रवास करणार असून त्यांना ३० व ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षेची तयारी तसेच परीक्षा घेण्यासाठी लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी.

त्याचप्रमाणे ‘एम एस इनोव्हेटिव्हवी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ हे ही एमपीएससी परीक्षेच्या कामाशी निगडित असल्याने त्यांनाही वैध तिकिटावर एका दिवसाकरीता प्रवास करण्याची मुभा द्यावी. तसेच गरज भासल्यास परीक्षा प्रवेश पत्र (हॉल तिकीट), कर्मचाऱ्यांचे ओळख पत्र (आयडी कार्ड) तसेच परीक्षेसाठी व्यक्तिगत किंवा एजन्सीला देण्यात आलेले प्रतिनियुक्ती पत्र याची शहनिशा करून परवानगी द्यावी असे पत्रात सविस्तरपणे लिहीले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नाशिकमध्ये बारदानाच्या गोदामाला भीषण आग

Ghaziabad Fire Update: कुलिंग टॉवर बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी

Nashik Robbery : ICICI होम फायनान्सच्या लॉकरवरच डल्ला; ५ कोटींचे दागिने लंपास, CCTV

Ramandeep Singh Catch: लखनऊमध्ये अवतरला 'सुपरमॅन' ; रमनदीपने २१ मीटर मागच्या दिशेने धावत टिपला IPL चा बेस्ट कॅच - Video

Manoj Jarange Patil on Jay Pawar Meeting | जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? दिले स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT