Sanjay Raut News  Saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut News : अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? संजय राऊत म्हणाले....

अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत नेमकं काय घडलं, यावर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sanjay Raut News : आम आदमी पक्षाचे अध्यक्ष, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत नेमकं काय घडलं, यावर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं. (Latest Marathi News)

खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राऊत यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर भाष्य करताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, '२०२४ ची आम्ही तयारी सुरू केली आहे. केजरीवाल आणि भगवंत मान यांच्यासोबत काही भूमिकांवर चर्चा झाली. केजरीवाल 'आप'लाही कोर्टात जाऊन न्याय मिळवावा लागतो'.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, 'फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय लागली आहे. पूर्वीचे आणि आताच्या देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फरक दिसून येत आहे. राजकारणामध्ये एकमेकांशी बोलत असतो. देवेंद्र फडणवीस सनसनाटी निर्माण करून काय सांगू इच्छित आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती ना, आज तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. तुम्ही किती काळ उपमुख्यमंत्री असाल, सांगता येत नाही. सर्व दिल्लीच्या मर्जीनुसार आहे. सनसनाटीचा आनंद घ्या'.

काँग्रेस उमेदवार रविंद्र धनंगेकरांनी कसबा पोटनिवडणुकीत पोलिसांच्या मदतीने भाजप कार्यकर्ते पैशांचा वाटप करत आहे असा आरोप केला आहे. त्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून पोलिसांच्या मदतीने पैसे वाटप हा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. मागच्या निवडणुकीत देखील हा प्रकार उघडकीस झालं होतं'.

'सुरक्षितपणे पैशांची वाटप कोण करू शकतं, तर पोलिसांची वाहने. हे पाच वर्षांपूर्वी उघडकीस आलं होतं. ज्यांनी आरोप केला असेल, तर त्यांच्या माहिती आहे. भाजपच्य कालखंडात पैशे वाटपाची उदाहरणे समोर आली आहेत. पोलीस पॉलिटिकल एजंट बनून पैसे वाटतात. हे पुराव्यासह उघड झालं आहे. रविंद्र धंगेकर आरोप करताहेत म्हणजे त्यांना पक्की माहिती असणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले, 'सरकारच्या मनात निवडणुकीला सामोरं जायचं भय आहे. सरकार पाडण्यात निर्लज्जपणा आणि बेडपपणा दाखवतात. तो बेडरपणा निवडणुका घ्यायला दाखवा'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : काल एक गद्दार बोलला जय गुजरात. किती लाचारी. - उद्धव ठाकरेंचा शिंदेंना जोरदार टोला

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT