navneet rana and uddhav thackeray saam tv
मुंबई/पुणे

Navneet Rana : उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही; खासदार नवनीत राणांची जहरी टीका

'दम असता तर ते घरात बसले नसते'. अशी जहरी टीका नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

साम टिव्ही ब्युरो

Navneet Rana vs Uddhav Thackeray : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात दम नसल्याची जहरी टीका नवनीत राणा यांनी केली. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या आघाडीवरून खासदार नवनीत राणा यांनी ही टीका केली आहे.

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येणार अशी घोषणा आज संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आली. 'सध्या लोकशाही धोक्यात आली आहे, यासाठी आम्ही नवे समीकरण जुळवत आहोत, लवकरच मोठा मेळावा घेणार आहे', अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे सौरभ खेडेकर यांनी दिली. या आघाडीवर निशाणा करताना खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी जहरी टीका केली. (Navneet Rana Todays News)

काय म्हणाल्या नवनीत राणा

'प्रत्येक व्यक्ती बाहेर पडून संघर्ष करते. स्वतःला सिद्ध करते. संभाजी ब्रिगेडचे काम जोरदार आहे. त्यांना उभा महाराष्ट्र जाणतो, त्यांच्या प्रति मला आदर आहे. पण उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही. दम असता तर ते घरात बसले नसते'. अशी जहरी टीका नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर केली. (Navneet Rana vs Uddhav Thackeray Latest News)

'मला उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वैयक्तिक आकस नाही, उद्धव ठाकरे यांना नवनीत राणा, रवी राणा, आणि हनुमान चालिसा यांच्याबद्दल आकस आहे'. असंही नवनीत राणा म्हणाल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, हनुमान चालिसा पठण करण्यावरून वाद झाला होता.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करू असा निर्धार केला होता. यावेळी शिवसैनिक आणि राणा दाम्पत्यांमध्ये वाद झाला होता. या वादानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटकही केली. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पुढे न्यायालयाने त्यांची सुटका केली होती.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT