navneet rana and uddhav thackeray
navneet rana and uddhav thackeray saam tv
मुंबई/पुणे

लिलावतीतून बाहेर पडताच नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना दिले Open Challenge

साम न्यूज नेटवर्क

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दम असेल तर त्यांनी जनतेतून निवडणुक (election) लढवावी असे आव्हान (challenge) खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी आज (रविवार) उद्धव ठाकरे (uddhav thackeray) येथे (mumbai) दिले. (navneet rana latest marathi update)

खासदार नवनीत राणा यांना लिलावती रुग्णालयातून घरी साेडण्यात आले. राणा या रुग्णालयाच्या बाहेर पडताच त्यांना माध्यमांनी गराडा घातला. त्यावेळी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राणा म्हणाल्या हनुमान चालिसा (hanuman chalisa) म्हणणे आणि देवाचे नाव घेतल्याने मला १४ दिवस त्यांनी जेलमध्ये टाकले. देवाचे नाव घेणे चुकीचे असेल तर ते १४ दिवस नव्हे तर १४ वर्ष जरी आत टाकले तरी तेवढीच ताकदीने मी बाहेर येईन. देशातील हनुमान आणि राम भक्त त्यांना त्याची जाग दाखवतील. मला दाबण्याचा काेणी प्रयत्न करु नये असेही राणांनी नमूद केले.

तुमच्यामध्ये दम असेल तर तुम्ही लाेकांमध्ये या आणि निवडून दाखवा. त्यांनी महाराष्ट्रातील (maharashtra) काेणताही मतदारसंघ निवडावा मी त्यांच्या विराेधात लढेन असे आव्हान राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले. त्या म्हणाल्या स्वतःच्या नावावार आणि भरवश्यवार आम्ही मेहनत करुन निवडून येऊ. तेव्हा त्यांना समजेल जनतेची ताकद काय असते असेही राणांनी नमूद केले.

Edited by : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivali Crime News : पती- पत्नीच्या भांडणात गमावला जीव; डोंबिवलीत दोन वेगवेगळ्या घटनामध्ये दोघांची हत्या

Today's Marathi News Live : माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण माघार घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल

Delhi News: मोठी बातमी! दिल्लीत १५ टन बनावट मसाले जप्त; भेसळीत ॲसिड अन् लाकडी भुशाचा समावेश

Kangana Ranaut : लोकसभा निवडणुकीत बाजी मारल्यास काय करणार? कंगना रणौतने सांगितला पुढील प्लान

बुलढाणा : 'डीजे' बंदीनंतर मंगल कार्यालय, लाॅन्ससाठी पाेलिसांची नियमावली; जाणून घ्या सूचना

SCROLL FOR NEXT