Kolhapur Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

उधारीचे पैसे देण्यास उशीर झाल्याने आई आणि मुलाला बेदम मारहाण, उल्हासनगरमधील धक्कादायक घटना

उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मात्र फरार झाले आहेत.

अजय दुधाणे

कल्याण : उधारीचे पैसे देण्यास उशीर झाला म्हणून आई आणि मुलाला बेदम मारहाण झाल्याची घटना उल्हासनगरच्या भय्यासाहेब आंबेडकर नगर परिसरात घडली आहे.याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मात्र फरार झाले आहेत.

निखिल चाबुकस्वार आणि मीना चाबुकस्वार असं जखमी झालेल्या मुलगा आणि आईचे नाव आहे.निखिल याने त्याच परिसरात राहणारे गणेश कांबळे आणि आकाश गायकवाड यांच्याकडून उधारीवर तीन हजार रुपये घेतले होते. ते पैसे देण्यास उशीर झाला म्हणून निखिल याच्यावर चाकू आणि लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आला.

निखिलच्या मदतीला गेलेल्या आईला देखील बेदम मारहाण करण्यात आली. ह्या मारहाणीत निखिल आणि मीना हे दोघे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान निखिलचे वडील भाजीपाल्याची हातगाडी लावण्यासाठी गेले असता त्याठिकाणी सुद्धा आरोपी यांनी दबाव आणून बेदम मारहाण केली. या घटनेनंतर चाबुकस्वार कुटुंबीय दहशतीच्या वातावरणात जगत असून पोलिसांनी तात्काळ आरोपी आकाश गायकवाड आणि गणेश कांबळे यांना अटक करून न्याय द्यावा अशी मागणी निखिल आणि त्याची आईने केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

Vidyadhar Joshi: 'सोनं खरेदी करणं म्हणजेच विनोद'; मोदींच्या आवाहनावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट

SCROLL FOR NEXT