Pune Saam
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात आईनेच बॉयफ्रेंडला पाठवले लेकीचे अश्लील व्हिडिओ, अनैतिक संबंध ठेवण्यासही पाडले भाग, पण शेवटी..

Woman and Lover Booked for Creating and Sharing Obscene Content of Her Daughter: एका विकृत आईनं बॉयफ्रेंडच्या मदतीने स्वत:च्या मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून सोशल मीडियात व्हायरल केले आहेत. तसेच बॉयफ्रेंडला अल्पवयीन मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवण्यास सांगितले.

Bhagyashree Kamble

अक्षय बडवे, साम टीव्ही

माय लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यातून समोर येत आहे. एका आईनं बॉयफ्रेंडच्या मदतीने स्वत:च्या मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून व्हायरल केले आहेत. तसेच आईने मुलीचे हे आक्षेपार्ह व्हिडिओ बॉयफ्रेंडलाही पाठवत त्याला पोटच्या मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवण्यास सांगितले. पोलिसांनी या घटनेनंतर विकृत आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे

भारती विकास कुऱ्हाडे या महिलेचे गुरूदेव कुमार स्वामी याच्यासोबत अनैतिक संबंध होते. पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत दोघेही आरोपी राहत होते. काही दिवसांपूर्वी महिलेने आपल्या बॉयफ्रेंडसोबत पोटच्या लेकीचे अश्लील व्हिडिओ शूट केले. नंतर व्हायरल केले. विकृत महिलेने ते व्हिडिओ काही नातेवाईकांनाही पाठवले.

तसेच तिने हा व्हिडिओ आपल्या बॉयफ्रेंडला पाठवत त्याला आपल्या मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवण्यास सांगितले. अल्पवयीन मुलीला याची माहिती मिळाल्यानंतर तिने घरमालकाला आई आणि आईच्या बॉयफ्रेंडने केलेल्या कृत्याची माहिती दिली. त्यानंतर आरोपी आई आणि तिचा प्रियकर दोघेही फरार झाले.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी फरार आरोपी आई आणि तिच्या प्रियकराचा शोध घेण्यास सुरूवात केली. कसून चौकशी करत नराधम आईसह तीच्या बॉयफ्रेंडला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. या संतापजनक घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय!; ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ठाकरे गट सोडण्याची कारणं

NEET Student: 'मला माफ करा...' नीटच्या आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, मृतदेह पाहून कुटुंबीय हादरले

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

Maharashtra News Live Update: पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचले

SCROLL FOR NEXT