sharad pawar  Saam Digital
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : शरद पवारांचे भाजप-अजितदादांना धक्के; विधानसभेसाठी काय आखली रणनीती? VIDEO

Tanmay Tillu

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मागील काही दिवसांपासून शरद पवार स्वत: निवडणुकीची रणनीती आखतायत. त्यातूनच कोल्हापूर, इंदापूरसह फलटणमध्येही पवारांनी खेळी केलीये.. इंदापूर येथील हर्षवर्धन पाटील यांना पक्षात प्रवेश देत शरद पवारांनी भाजपासह पुतण्या अजित पवारांना मोठा धक्का दिलायं. त्यानंतर पवार धक्क्यावर धक्के देतायत.

शरद पवारांचं 'मिशन 50'

- साखरपट्ट्यावर अर्थात पश्चिम महाराष्ट्रावर शरद पवारांचं विशेष लक्ष

- पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा पारंपारिक गड

- 2019 च्या विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीने 37 जागा जिंकल्या

- लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात 12 पैकी 8 जागा मविआनं जिंकल्या

त्यामुळे येत्या विधानसभेला पश्चिम महाराष्ट्रातील 67 पैकी किमान 50 जागा जिंकण्याचं लक्ष्य शरद पवारांनी ठेवले आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात कुठे किती जागा आहेत तेही पाहू

विधानसभेच्या किती जागा ?

पुण्यात विधानसभेच्या 21 जागा

सांगलीत विधानसभेच्या 08 जागा

कोल्हापुरात विधानसभेच्या 10 जागा

साताऱ्यात विधानसभेच्या 08 जागा

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. सहकार चळवळीतील नेते म्हणून भाजपाला हर्षवर्धन पाटील यांच्या जाण्याने फटका बसण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात कोल्हापूरात समरजितसिंह घाटगे यांनीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला.पक्ष सोडलेले अनेक नेते पुन्हा परतीच्या वाटेवर...अजित पवारांच्या गटाचे कोणते आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत पाहूया.

'घड्याळ' काढणार, 'तुतारी' फुंकणार?

रामराजे नाईक निंबाळकर

अतुल बेनके

बबन शिंदेंचा मुलगा रणजित शिंदे

डॉ. राजेंद्र शिंगणे

संजयमामा शिंदे

नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ

आगामी विधानसभेच्या पार्श्वभुमीवर शरद पवार मैदानात उतरलेत...आता त्यात किती यश मिळते हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Garba King Video : गरबामुळे हार्ट अटॅकचा धोका? मुलासोबत खेळता खेळता अचानक गेला जीव, VIDEO

Fact Check : डासांना मारणाऱ्या कॉईलचा धूर आरोग्यासाठी घातक? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

Ranveer Singh: रणवीर सिंगचा रूबाबदार लूक, एकदा बघाच...

Vinesh Phogat : कुस्तीचा आखाडा, ऑलिम्पिक ते निवडणूक; विनेश फोगाटच्या आयुष्यात ८ तारखेचा मोठा योग

Maharashtra Politics: कॉन्फिडन्स वाढला! हरियाणाच्या विजयानं भाजप आक्रमक; राज्यातही पुन्हा महायुती सरकार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT