Monsoon News Updates in maharashtra Saam Tv
मुंबई/पुणे

Monsoon Update: 'तो' येतोय! पुढील दोन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

मान्सून राज्यात अजुनही पूर्ण क्षमतेने सक्रीय झालेला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले आहे, पण पूर्ण क्षमतेने अजुनही पावसाला (Rain) सुरूवात झालेली नाही. मान्सून वेळेअगोदरच दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. संपूर्ण राज्यात अजूनही मान्सून सक्रीय झालेला नाही. राज्यातील शेतकऱ्यांनी पेरण्यांची पूर्व तयारी करुन ठेवली आहे, पण पूर्ण क्षमतेने मान्सून सक्रीय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या नाहीत. आज १८ जूनपासून राज्यात राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Monsoon Update)

१८ जूनपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणात सोमवारपासून अति मुसळधार पावसाची शक्यता वर्वली आहे. त्यामुळे मान्सूनसाठी (Monsoon) आता पुन्हा पोषक वातावरण तयार झाले आहे. (Maharashtra Monsoon Latest News)

जून महिन्याची १८ तारीख आली तरीही अजूनही मान्सून (Monsoon) पूर्ण क्षमतेने सक्रीय झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केलेली नाही. आज राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाने पुन्हा सुरूवात केली आहे, त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास सुरूवात केली आहे.

आज अकोल जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी (Farmer) पेरणीस सुरुवात केली आहे. तर पूर्ण क्षमतेने पावसाला सुरुवात झाल्याशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन कृषी विद्यापीठाने केले आहे. येत्या दोन दिवसात कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

दोन दिवसापासून विदर्भातही पावसाचे वातावरण झाले होते, पण अजुनही पूर्ण क्षमतेने पावसाला सुरूवात झालेली नाही. विदर्भातही शेतकऱ्यांची पेरणी झालेली नाही.

या जिल्ह्यात येलो अलर्ट

१९ जून- ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.

२० जून- पालघर, ठाणे, रायगड, सातारा, कोल्हापूर, नागपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली

२१ जून- पालघर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली

२२ जून- पालघर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असतानाच भारतीय खेळाडूची निवृत्ती, १७ वर्षाच्या करिअरचा शेवट

Maharashtra Live News Update : - नुकसानग्रस्त कुटुंबीयांसमवेत अंबादास दानवेंनी साजरी केली दिवाळी

Sangli Water Supply : ऐन दिवाळीत सांगली शहरात पाण्याचा ठणठणाट; संतप्त नगरसेवकांनी पाणीपुरवठा कार्यालयासमोर धरणे

Rohit Pawar : दोन्ही पक्षातील अनेक आमदार भाजपमध्ये जातील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

मातोश्रीत भाजपच्या माजी नगरसेवकासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश; नरकासुराचा वध करण्यासाठी आला-उद्धव ठाकरे|VIDEO

SCROLL FOR NEXT