Monsoon News updates in Marathi Saam Tv
मुंबई/पुणे

Monsoon Update: राज्यात मान्सूनची एन्ट्री? पुण्यात हलक्या पावसाची शक्यता

Monsoon News updates in Marathi: राज्यात मान्सूनची एन्ट्री? पुण्यात हलक्या पावसाची शक्यता

साम टिव्ही ब्युरो

Monsoon News updates in Marathi: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधये पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने अंदाज वर्तवला आहे की, येत्या दोन दिवसांत राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

यातच कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी गुरुवारी पावसाने हाजरी लावली आहे. तर विदर्भात शनिवारी आणि रविवारी काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तमिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दरम्यान, विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदविले आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमानाचा पारा ३४ ते ४० अंश सेल्सिअस इतका होता. राज्यात अकोला येथे ४३.७ अंश सेल्सिअस अशा उच्चांकी तापमानाची नोंद झाली. (Latest Marathi News)

पुण्यात हलक्या पावसाची शक्यता

पुण्यात गुरुवारी दुपारी आणि संध्याकाळी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

तसेच शुक्रवार ते रविवार दरम्यान आकाश निरभ्र राहून दुपारी आणि संध्याकाळी  अंशत: ढगाळ राहील, असे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. पुण्यात बुधवारी ३९.६ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले.

दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण अंदमान निकोबार यांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रवेश केला आहे. दरम्यान अरबी समुद्रातील आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मालदिव आणि कोमोरिन यासह बंगालच्या उपसागराचा उर्वरित भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवावे, मन प्रसन्न राहील; ५ राशींच्या लोकांची दुप्पट वेगाने प्रगती होणार

Famous Actor Death: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते काळाच्या पडद्याआड; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Late Night Eating: रात्री पोटभर जेवणं पडेल महागात; डॉक्टरांचा इशारा, वाढू शकतात गंभीर आजार

Maharashtra News Live Update: CSMT ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुणे स्टेशनवर चौथ्या डब्याचा एक ट्रॉली घसरला.

ILS Law College: 'वसतिगृहात दारू आणि ड्रग्जच्या पार्ट्या', कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचं रँगिंग

SCROLL FOR NEXT