राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल तरूणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले. त्यांनी थेट पोलीस ठाण्यावर धडक दिली. saam tv
मुंबई/पुणे

Dombivli News : राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; डोंबिवलीत मनसैनिक आक्रमक, थेट पोलीस ठाण्यावर धडकले

objectionable post against Raj Thackeray : राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या सोशल पोस्टने डोंबिवलीत वातावरण तापलं होतं.

Nandkumar Joshi

संघर्ष गांगुर्डे, कल्याण | साम टीव्ही

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या आरोपावरून डोंबिवलीत काही वेळ वातावरण तापले. तरुणाच्या आक्षेपार्ह पोस्टनंतर मनसैनिक आक्रमक झाले. या प्रकरणात रामनगर पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली.

एका तरुणाने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील स्टेटसवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठी माणसाबद्दल आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याचा आरोप आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. संबंधित तरुणाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.

या तक्रारीची पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुणाने दारूच्या नशेत असताना ही पोस्ट केल्याचे तपासात उघड आले आहे. आक्षेपार्ह पोस्टमुळं डोंबिवलीतील मनसैनिक आक्रमक झाले. काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. मनसेने या प्रकरणात कठोर आणि ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मनसे पदाधिकारी राहुल कामत यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले. या घटनेनंतर डोंबिवली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT