लालचौकी सिग्नल वाहनचालकांसाठी त्रासदायक, मनसे कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

लालचौकी सिग्नल वाहनचालकांसाठी त्रासदायक, मनसे कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन...

आतातरी या समस्येकडे प्रशासन लक्ष देईल का हे पहावे लागेल.

प्रदीप भणगे

कल्याण - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र आतापर्यंत जी कामे झाली आहेत त्यात काही त्रुटी दिसून येत आहेत. केडीएमसी प्रशासनाने कोट्यवधींचा खर्च करून शहरात सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी लाखो रुपये मोजून समंत्रकाच्या माध्यमातून शहराचा सर्व्हे करत 20 ठिकाणी सिग्नलची संख्या निश्चित केली आणि सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली.

हे देखील पहा -

मात्र काही ठिकाणी अद्याप सिग्नल चालू झालेले नाहीत. तर लालचौकी चौकात काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या सिग्नल समोर पथदिव्याचा खांब आडवा असल्याने दोन बाजूने येणाऱ्या वाहनचालकांना सिग्नल दिसत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे दुचाकीवर मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला गाडीवरून उतरून सिग्नल चेक करावा लागतो.

जर वाहनचालकाला सिग्नलचा अंदाज आला नाही आणि त्याने सिग्नल तोडल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तर अनेक वाहनचालकांना सिग्नल दिसत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

सिग्नल योजना नीट करण्यासाठी कल्याण मनसे कार्यकर्त्यांनी लालचौकी परिसरात आंदोलन छेडत सिग्नल समोर असलेल्या पथदिव्यावर तीन रंगाचे स्टिकर चिटकवत आणि स्मार्ट सिटी हाय हाय अशी नारेबाजी करत निषेध व्यक्त केला. मनसे कल्याण शहर संघटक रुपेश भोईर , प्रणय साटम, प्रशांत जाधव , तुषार भालेकर, दानिश सय्यद, दिव्य कुमार शेजवळ यांनी हे आंदोलन केले. आतातरी या समस्येकडे प्रशासन लक्ष देईल का हे पहावे लागेल.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri : रत्नागिरीत भयंकर घडलं! सकाळी झोपेतून लवकर उठवल्याने सुनेची सटकली, सासूच्या डोक्यात फळी घातली नंतर...

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्यवसाय क्षेत्रात एन्ट्री; मुंबईजवळ सुरू केले हॉटेल, VIDEO चर्चेत

Maharashtra News Live Update: जळगाव महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात

High Blood Pressure: रक्तदाब वाढण्यामागे फक्त मीठच नाही, या ६ चुका रोज करत असाल तर हृदयावर वाढतो मोठा ताण

धक्कादायक! कल्याणमध्ये महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; 20 पीडितांची सुटका

SCROLL FOR NEXT