Sandip Deshpande Saam TV
मुंबई/पुणे

शिवसेना भवन म्हणजे मस्जिद आहे का?; संदिप देशपांडेंची शिवसेनेवर आगपाखड

मनसेने आज रामनवमी निमीत्त शिवसेनेचे (Shivsena) मुख्यालय असलेल्या 'शिवसेना भवनास'मोर लाऊडस्पीकर लावले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

भूषण शिंदे

मुंबई: राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर मनसेवरती काही प्रमाणात टीका झालेली पाहायला मिळाली. राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या भूमिकेवरुन पक्षातील आणि राज्यातील मुस्लीम समाज नाराज झाल्याचे सर्वांनी पाहिले. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले आहेत. आज तर मनसेने थेट शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मनसेने आज रामनवमी निमीत्त शिवसेनेचे (Shivsena) मुख्यालय असलेल्या 'शिवसेना भवनास'मोर लाऊडस्पीकर लावले आहेत.

राज ठाकरेंनी (Raj Thackeray) दिलेली शिवाजी पार्कवरुन दिलेली हाक कुठेतरी कार्यकर्ते पाळताना दिसत आहेत. मनसेने लाऊडस्पीकरवरती हनुमान चालीसा लावली होती. आणि तीही शिवसेना भवनासमोर. त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून पोलिसांनी मनसेचे लाऊडस्पीकर जप्त करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

आता यावर मनसेचे नेते संदिप देशपांडे (Sandip Deshpande) यांची प्रतिक्रिया आली आहे. शिवसेना भवन म्हणजे मस्जिद आहे का? आज रामनवमी निमीत्त सेना भवनबाहेर जर हनुमान चालीसा चे पठाण केले तर यात अचानक काय आहे? शिवसेना भवन काय मस्जिद आहे का? शिवसेना भवन हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एक पवित्र स्थान आहे. मग त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांच्या सरकारला अडचण काय आहे? मस्जिद समोर हनुमान चालीसा लावली तर कायदा आणि सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होतो. ठाकरे सरकार हे तालिबानी आहे का? असा प्रश्न संदिप देशपांडे यांनी विचारला आहे.

दरम्यान राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील भाषण चांगलंच वादग्रस्त ठरलं होते. पक्षातीलच पदाधिकारी या वक्तव्याने नाराज झाले होते. अनेक ठिकाणी राज ठाकरेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. पुण्यातील मनसेचे माजी शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरेंचा आदेश न पाळल्याने शहर अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले होते. त्याचबरोबर राज्यभरातून अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. काही मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याला समर्थन केले होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibaug Tourism : मन उधाण वाऱ्याचे...; पक्ष्यांचा किलबिलाट अन् सूर्यास्ताचे देखणे रूप, अलिबागजवळ लपलाय 'हा' सुंदर समुद्रकिनारा

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये संतांच्या पादुकांचे रिंगण सोहळा

Hair Wash Tips: दोन, तीन की दररोज...; आठवड्यातून नक्की किती वेळा केस धुवावे

Hairstyles For Long Face Women: नेहमीच्या हेअर स्टाइल्स विसरा; ट्राय करा 'या' आकर्षक अन् युनिक Hair Styles, तुम्हीच दिसाल सुंदर

Sunday Horoscope: पैशाची तंगी भासेल, 'या' राशीच्या लोकांनी डोकं ठेवा शांत; वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT