Raj Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray: भोंगे दिसतील तिथे ट्रकमध्ये स्पीकरवर हनुमान चालिसा लावा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना पुन्हा आदेश

पण अजून काही जणांची चरबी जिरलेली नाही, त्या धडा शिकवला पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा भोंग्यांचा मुद्दा समोर आणला आहे. जिथे मशिदींवर भोंगे दिसतील तिथे पुन्हा एकदा मोठ्या ट्रकमध्ये स्पीकर हनुमान चालिसा लावा, असे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे गटाध्यक्ष मेळाव्याला संबोधित केले. 

बाळासाहेब जी भूमिका बोलत होते, मशिदींवरील भोंगे उतरले पाहिजेत ती इच्छा आपण पूर्ण केली. आपण मशिदींवरील भोंगे काढा असे नाही म्हणालो, तर हनुमान चालिसा लावू असं सांगितलं. पण अजून काही जणांची चरबी जिरलेली नाही, त्या धडा शिकवला पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

जिथे जिथे मशिदींवर भोंगे सुरु असतील तिथे आधी स्थानिक पोलिसांना तक्रार दाखल करा. त्यानंतरही काही झालं नाही तर मोठ्या ट्रकमध्ये स्पीकर लावून हनुमान चालिसा लावा. मला माझ्या महाराष्ट्र सैनिकाकडून ही अपेक्षा आहे, तेच हे करु शकतात, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

मनसेच्या १६ वर्षातील आंदोलनाची पुस्तिका काढणार

 'महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या आंदोलनानंतर राज्यातील ६५हून अधिक टोल बंद झाले. आपण एक पुस्तिका काढत आहोत. ज्यामध्ये गेल्या १६ वर्षात किती आंदोलनं केली. ती कशी यशस्वी झाली याचा आढावा या पुस्तकात असणार आहे, अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली. 

'महाराष्ट्रात आता जो काही खोळंबा झाला आहे की त्यामुळे काय होईल हे सांगता येत नाही. सर्वसाधारण फेब्रुवारी मार्चमध्ये निवडणुका लागतील असं आपण पकडून चालूया. मनसेला आज १६-१७ वर्ष झाली. या दरम्यान आपण जी आंदोलनं केली, ज्या भूमिका घेतल्या त्यात आपल्याला इतर पक्षांपेक्षा सर्वात जास्त यश आलं आहे. मात्र मनसेकडून जी आंदोलनं होतील ते लोकांच्या विस्मरणात कसे जाईल यासाठी काही यंत्रणा काम करत होत्या, असे राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंची ताकद वाढली! अपक्ष आमदारासाठी थेट हेलिकॉप्टरच पाठवलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Eknath Shinde Press Conference: साष्टांग दंडवत! शिंदे- फडणवीस- पवार लाडक्या मतदारांसमोर नतमस्तक; पाहा VIDEO

Amit Thackeray: मुंबईत राज ठाकरेंना धक्का, अमित ठाकरेंचा पराभव; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने मैदान मारलं

Maharashtra Politcs : सहानभुती संपली, मविआ हारली; आघाडीच्या पराभवाची कारणे काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT