MNS Latest News Saam tv
मुंबई/पुणे

MNS Latest News: मराठी नाकारणाऱ्यांना दणका मिळेल, मराठी पाट्यांवरून मनसेचा दुकानदारांना इशारा

MNS Latest News in Marathi: आंदोलन करणाऱ्या काही आंदोलकांची धरपकड देखील पोलिसांनी सुरु केली आहे. याचदरम्यान, जो दुकानदाराने मुजोरपणाने मराठी नाकारेल, त्यांना दणका मिळेल, असा इशारा मनसेने दिला आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, पुणे

Pune News In Marathi:

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. तर दुसरीकडे मराठी पाट्याच्या मुद्दयांवरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेने आंदोलांनाचा पवित्रा घेतला आहे. मराठी पाट्यांसाठी आंदोलन करणाऱ्या काही आंदोलकांची धरपकड देखील पोलिसांनी सुरु केली आहे. याचदरम्यान, जो दुकानदाराने मुजोरपणाने मराठी नाकारेल, त्यांना दणका मिळेल, असा इशारा मनसेने दिला आहे. (Latest Marathi News)

पुण्यात मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन

सुप्रीम कोर्टाने राज्यातील दुकानदारांना मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही राज्यातील काही भागात दुकानदारांकडून कोर्टाच्या आदेश पालन न केल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकाने आणि आस्थापनाच्या विरोधात आक्रमक होत मनसे (MNS) स्टाईलने आंदोलन सुरू केलं आहे. सरकारच्या कोणत्याच यंत्रणेने कारवाई न केल्याने मनसेने आक्रमक आंदोलन सुरु केले आहे.

मनसेचा दुकानदारांना इशारा

मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना बहुराष्ट्रीय ब्रँडेड दुकाने लक्ष करण्यात आली.या काही ठराविक कंपन्या मुजोरपणाने कायदे पायदळी तुडवत असेल. पूर्वग्रहदूषितपणे मराठी भाषा नाकारत असतील तर त्यांना आक्रमक भाषेत उत्तर मिळणार,असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, ज्या दुकानांवर मराठी देवनागरी लिपीत पाट्या नसतील, त्यांनी कायदा पाळावा. दुकानाच्या पाट्या मराठी देवनागरी लिपीत लावावेत, त्यांचं पुष्गुच्छ देऊन स्वागत अभिनंदन केलं जाईल, असं मनेसेने स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : ठाकरे गटाच्या आमदाराच्या जवळच्या सहकाऱ्याचा धिंगाणा, कारमधून फोडले २८८ फटाके

Shocking : आशियाई खेळात भारताचं नेतृत्व करणाऱ्या खेळाडूने आयुष्य संपवलं, क्रीडा विश्वात खळबळ

भारताविरोधात चीन्यांची नवा डाव? पेंगाँग जवळ चीनचा हवाई तळ?

Shocking : कॉलेजला जाताना अडवलं; भररस्त्यात तरुणीवर तरुणाकडून अॅसिड हल्ला, राजधानीत खळबळ

Vitamins: जास्त व्हिटॅमिन्सही बरं नव्हं! अति सेवनाने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT