Raju Patil, Shrikant Shinde and Ravindra Chavhan SAAM TV
मुंबई/पुणे

Dombivli Politics : शिंदे गटासमोर भाजपचं काही चालत नाही; मनसे आमदार राजू पाटील यांनी डिवचलं

Raju Patil - Shrikant Shinde : कल्याण-डोंबिवलीत शिवसेना (शिंदे गट) आणि मनसे यांच्यात राजकीय 'शीतयुद्ध' सुरूच आहे.

Nandkumar Joshi

अभिजित देशमुख

MNS MLA Raju Patil :

कल्याण-डोंबिवलीत शिवसेना (शिंदे गट) आणि मनसे यांच्यात राजकीय 'शीतयुद्ध' सुरूच आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी यावेळी शिंदे गटाच्या खांद्यावरून भाजपवर थेट 'बाण' सोडला आहे.

भाजपने महापौर निवडून आणण्याच्या वल्गना करूच नये. कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासमोर भाजपचं काहीही चालत नाही, अशा शब्दांत पाटील यांनी भाजपला डिवचलं आहे.

कल्याणमधील रुग्णालयाच्या कारभारावरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडलं होतं. आता राजकीय मुद्द्यावरूनही पाटील यांनी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपवर तोफ डागली आहे.

कल्याण-डोंबिवलीत आगामी काळात भाजपचा महापौर असेल, असा दावा पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. यावरून राजू पाटील यांनी भाजपची खिल्ली उडवली.

प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या पक्षाचा महापौर असला पाहिजे. मनसेचाही महापौर असावा, अशी आमची इच्छा आहे, असे राजू पाटील म्हणाले.

कल्याण-डोंबिवली महापालिकापुरतं बोलायचं झालं तर, शिंदे गटासमोर भाजपचे काही चालत नाही. मात्र बहुमत आले तर, त्यांना महापौरपदाच्या शुभेच्छा, असा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला.

मुंबई-गोवा महामार्गावरूनही साधला होता निशाणा

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरूनही काही दिवसांपूर्वी राजू पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला होता. मनसेने महामार्गावर कोकण जागर यात्रा काढली होती. महामार्गावरील खड्ड्यांवरून आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती.

मनसेच्या या यात्रेनंतर भाजपच्या कल्याण ग्रामीण जागर यात्रेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यावर भाजपने जागर यात्रा काढावी, गाजर यात्रा काढू नका, असा टोला पाटील यांनी लगावला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय; रविंद्र चव्हाणांनी सांगितला पक्षाचा इतिहास

Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT