MNS Mla Raju Patil Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli News: पूछता है डोंबिवलीकर! रस्त्याच्या कामाच्या दर्जावरून मनसे आमदार राजू पाटील आक्रमक

MNS Mla Raju Patil: डोंबिवलीमध्ये काही दिवसांपूर्वीच बनवण्यात आलेय रस्त्याची दुरावस्था झाल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

डोंबिवली जिमखाना परिसरात एमएमआरडीएने लाखोंचा निधी खर्च करत काँक्रिटचा रस्ता तयार केला. मात्र महिन्याभरातच या रस्त्याला तडे गेल्याने पुन्हा या रस्त्याची दुरुस्ती हाती घेण्यात आली. त्यामुळे या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी वीट करत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना लक्षात करत कारवाईची मागणी केली.

अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या पैशांचा चुराडा होतोय? पुछता है डोंबिवलीकर ! कारवाई कोणावर होणार? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांना ट्वीट करत त्यांनी विचारला आहे.

एमएमआरडीएने महिनाभरापूर्वी लाखो रुपयांचा निधी खर्च करत डोंबिवली पूर्वेकडील जिमखाना परिसरातील रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र अवघा महिनाभराचा कालावधी उलटत नाही तोच या रस्त्याला तडे गेले.

एमएमआरडीएने पुन्हा हा रस्ता खोदून या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळेरस्त्याच्या कामाच्या गुणवत्ता दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी करत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना लक्ष केले. तसेच याला जबाबदार कोण आणि कारवाई कोणावर होणार, असा सवाल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा खासदारांना ट्वीट करत विचारलाय.

आमदार राजू पाटील काय म्हणाले?

राजू पाटील ट्वीट करत म्हणाले की, डोंबिवलीमधील रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रस्त्यांची काम करून पुन्हा निकृष्ट दर्जाचा ठपका ठेवत रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. नुकताच एमएमआरडीएच्या माध्यमातून डोंबिवलीच्या जिमखाना परिसरात रस्त्याचं काँक्रिट करण्याचं काम करण्यात आलं होतं. मात्र आता निकृष्ट दर्जाचा ठपका ठेवून पुन्हा काँक्रिटचा रस्ता खोदण्याचे काम सुरू आहे. डोंबिवलीकरांसाठी मंजूर असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीचा बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे चुराडा होत असल्याने या बेजबाबदार पणाला जबाबदार कोण? हे तर डोंबिवलीकर विचारणार ना? पुछता है डोंबिवलीकर! कारवाई कोणावर होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reelstar Death: 'चिमणे, परत ये गं...'; रिलस्टार रोहिणीच्या आत्महत्येनंतर पतीची भावुक पोस्ट, पण नेटकरी संतापले, कारण?

Maharashtra News Live Update: कोल्हापूरात जलशुल्क दरवाढीला सतेज पाटील यांचा विरोध

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT