Eknath shinde and Devendra Fadnavis  saam tv
मुंबई/पुणे

MNS: 'तुमचं सर्व ओक्के आहे हो,पण...'; मनसे आमदाराने शिंदे सरकारवर साधला निशाणा

शिंदे-फडणवीस सरकारवर मंत्रिमंडळ विस्तारावरुन आरोप सुरू आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे (Shiv Sena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केले. सरकार स्थापन होऊन एक महिना झाले पण अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. यावरुन आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

गेल्या काही दिवसापासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू आहेत, यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात येत आहेत. मंत्रिमंडळ विस्तार काही दिवसात होईल असं सांगण्यात येत आहे.

बंड झाले,आता थंड झाले ? पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्हाला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत,मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झालंय,सर्वकाही ठप्प आहे, असा टोला मनसे आमदार राजू पाटील यांनी लगावला आहे.

तुमचे सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे सण आलेत. रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी,रोगराई वाढत आहे. याकडे कोण बघेल, असा सवालही राजू पाटील (Raju Patil) यांनी केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारवर आता मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करुन टीका केली आहे. बंड झाले,आता थंड झाले ? पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्हाला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत,मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झालंय,सर्वकाही ठप्प आहे. तुमचं सर्व ओक्के आहे हो,पण लोकांचे सण आलेत.रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी,रोगराई वाढत आहे.याकडे कोण बघेल ? असं ट्विट मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Detox: स्वयंपाकघरातील या पदार्थांनी लिव्हर होईल स्वच्छ, फॅट आणि घाण होईल झटक्यात दूर

Long Hair Tips: लांब आणि सरळ केसांसाठी करा 'हे' ३ सोपे घरगुती उपाय; पार्लरचा हजारो रूपयांचा खर्च वाचेल

Avatar 3: हॉलिवूडचा 'अवतार ३' थिएटरमध्ये पास झाला की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू

Maharashtra : नांदेडमध्ये १५०० मतदारांना डांबून ठेवले, भाजप आमदारावर आरोप, राज्यात कुठे काय झालं?

SCROLL FOR NEXT