Aditya Thackeray-Raju PAtil Saam TV
मुंबई/पुणे

Raju Patil on Aditya Thackeray : कल्याण लोकसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार? मनसे आमदार राजू पाटील म्हणतात...

Political News : मनसे आमदार राजू पाटील यांनी इथल्या लोकप्रतिनिधींबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये रोष आहे. त्यांना बदल हवा आहे, त्यासाठी या सर्व गोष्टी घडत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Kalyan News :

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे कल्याण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चेनंतर राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी इथल्या लोकप्रतिनिधींबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये रोष आहे. त्यांना बदल हवा आहे, त्यासाठी या सर्व गोष्टी घडत आहेत.

या मतदारसंघात बदल करण्याच्या अनुषंगाने किंवा फायदा घेण्याच्या अनुषंगाने सर्व उड्या घेत आहेत. त्या सर्वांना शुभेच्छा, असा टोला अप्रत्यक्षरित्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह आदित्य ठाकरे यांना लगावला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कल्याण लोकसभा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. काही दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे निवडणूक लढणार आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी हे विधान केले आहे. (Latest Marathi News)

मनसे आमदार राजू पाटील हे देखील कल्याण लोकसभा मतदारसंघात मनसेचा उमेदवार असल्याची चर्चा आहे. याबाबत बोलताना राजू पाटील यांनी मी सध्या पक्षाचा उमेदवार नाही. मात्र पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारणार. प्रत्येक पक्ष आपापल्या भूमिका जाहीर करत असतो, त्यांना तो अधिकार आहे. त्यावर जास्त भाष्य करणार नाही. ज्या वेळेला आमचा पक्ष भूमिका मांडेल ती मी आपल्यासमोर स्पष्ट करेल, असंही राजू पाटील यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT