Sandeep Deshpande News Saam Tv
मुंबई/पुणे

Sandeep Deshpande Attack News: संदीप देशपांडेंवरील हल्ल्यातील मास्टरमाईंडबाबत मोठी अपडेट, हल्ल्याचं कारणही आलं समोर

Big Update On Sandeep Deshpande Attack: मनसे नेते संदीप देशपांडे 3 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे

Mumbai News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे  (Sandeep Deshpande)   यांच्यावरील हल्ला प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली होती. मनसे नेत्यांनी या हल्लाप्रकरणी थेट ठाकरे गटाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. घटनेनंतर या हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते.

मात्र या हल्ल्यात कोणत्याही वरीष्ठ राजकीय नेत्याचा समावेश नसल्याचे तपासात निष्पन्न झालं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील चौघांपैकी अशोक खरात हाच मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ल्यानंतर प्रसिद्धी मिळून येणाऱ्या पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळेल, या आशेने अशोक खरातने हा कट रचल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात मनसे नेते अमेय खोपकरांनी आदित्य ठाकरे-संजय राऊतांचे नाव घेतल्याने वातावरण तापले होते. (Latest Marathi News)

काय आहे प्रकरण?

मनसे नेते संदीप देशपांडे 3 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. नेहमी त्यांच्यासोबत दोन-चार मित्र असतात. मात्र त्या दिवशी ते एकटेच होते. ही संधी साधून दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर मागून हल्ला केला. हल्लेखोरांच्या हातात स्टम्प आणि रॉड होते. त्यांनी संदीप देशपांडे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, हल्लेखोरांना देशपांडे यांनी चांगलाच प्रतिकार केला होता. दरम्यान, हल्लोखोरांशी झटापट करत असताना संदीप देशपांडे यांच्या हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली. मात्र त्यांना डोक्याला किंवा शरीरावर इतर कुठे जखम झाली नाही. हल्ल्यानंतर शिवाजी पार्कमधील लोक त्यांच्या मदतीला धावले. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर संदीप देशपांडे यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

लोणावळा-खंडाळापेक्षा पावसाळ्यात 'या' ठिकाणी होते पर्यटकांची तुफान गर्दी; तुम्हाला माहितीये का हे ठिकाण?

SCROLL FOR NEXT