uddhav Thackeray Aditya Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

'भावनिक साद घालण्यापेक्षा ठाकरे पिता-पुत्रांनी आता थेट गुवाहाटी गाठावी'

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकारचं बहुमत कमी झालं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकारचं बहुमत कमी झालं आहे. बंडखोर आमदारांना परत माघारी बोलवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह उर्वरित शिवसेना नेते भावनिक साद घालत आहे. तुम्ही मुंबईत या, आपण या विषयावर बोलू हवं तर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मात्र, तरीही एकनाथ शिंदे यांनी आपलं बंड कायम ठेवलं आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून मनसेनं शिवसेनेला टोला लगावला आहे. (Uddhav Thackeray Latest News)

'भावनिक साद घालण्यापेक्षा ठाकरे पिता-पुत्रांनी आता थेट गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेवून यावे.( विमानाचा खर्च परवडणार नाही) नाहीतर छोटे नवाब यांना पण शिंदे सेनेत सामील करून स्वतःचे मुख्यमंत्री पद नाही पण किमान छोटे नवाब यांचे मंत्रीपद तरी वाचवावे' असं ट्विट मनसे नेते गजानन काळे यांनी केलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. अशातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. बहुमत सिद्ध करा, या आशयाचं हे पत्र आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारने आता बहुमत चाचणी विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

'राज्यपाल याच दिवसाचा विचार करत होते. ही कायदेशीर कृती आहे. १६ आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहेत. ११ तारखेपर्यंत निर्णय होणार नाही. बेकायदेशीर कृत्य या काळात काही झालं तर आमच्याकडे या असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. राज्यपाल भवन आणि भाजप मिळून संविधानाची मजाक उडवत आहे. आमचे लोक सर्वोच्च न्यायालयात जाणार आणि न्याय मागणार, आजही आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे', असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pushpa 2 Actor News: पुष्पा चित्रपटाचा स्टार अभिनेता अडचणीत! महिलेने केले लैंगिक शोषणाचे आरोप

Shirur News : धक्कादायक..सोने चोरीसाठी तोडला महिलेचा कान; दरोडेखोरांचे भयानक कृत्य

Panipuri : स्ट्रीट स्टाइल चटपटीत पाणीपुरीचे पाणी, फक्त वापरा 'हा' पदार्थ

Nail paint: नेलपेंट लावायची सवय असेल तर आजच व्हा सावधान अन्यथा... होतील 'हे' गंभीर परिणाम

Ballot Paper Voting : EVM नकोच, बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात; काँग्रेस, ठाकरे-पवार गट एकवटले

SCROLL FOR NEXT