MNS Leader Gajanan Kale Slams To MVA Government Twitter/ @GajananKaleMNS
मुंबई/पुणे

या सरकारची घटिका जवळ आली आहे; मनसे नेते गजानन काळे यांचा सरकारवर हल्ला

MNS Leader Gajanan Kale Slams To MVA Government : या सरकारची घटिका जवळ आली आहे याचं हे लक्षण आहे असा टोला त्यांनी सरकारला लगावला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सांगली, परळीमधून अटक वॉरंट काढण्यात आलय. याबाबत मनसेचे (MNS) नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे (Ganajan Kale) यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. जेव्हा सरकार आम्हाला घाबरते तेव्हा पोलिसांना पुढे करते असा टोला त्यांनी सरकारला लगवला आहे. तसेच राणा दाम्पत्याच्या प्रकरणात सरकार तोंड घाशी पडलं आहे. पोलिसांच्या, सत्तेचा दुरुपयोग केला जातोय असा आरोप करत आम्ही या दडपशाहीला आम्ही भीक घालत नाही असा इशारा देत या सरकारची घटिका जवळ आली आहे याचं हे लक्षण आहे असा टोला त्यांनी सरकारला लगावला आहे. (MNS Leader Gajanan Kale Slams To MVA Government)

हे देखील पाहा -

औरंगाबादमधील सभेनंतर गुन्हा दाखल झालेले मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अडचणींत आणखी भर पडली आहे. बीडमधील परळी न्यायालयानं आता राज यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे. गृहमंत्रालयातील सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. यापूर्वी सांगली न्यायालयानं त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. २००८ मधील खटल्यानंतर आता परळी न्यायालयानंही राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. राज ठाकरेंविरोधात गेल्या आठवडाभरातील दुसरं अजामीनपात्र वॉरंट आहे. सांगली (Sangli) न्यायालयानं देखील त्यांच्याविरोधात २००८ मधील प्रकरणात वॉरंट बजावलं होतं. या प्रकरणात राज यांच्याविरोधात भादंवि कलम १४३, १०९, ११७ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राज ठाकरेंनी भोंग्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेनंतर राज्यात मनसैनिकांनी ४ एप्रिलला अनेक ठिकाणी हनुमान चालीसा स्पीकरवर वाजवत आंदोलन केले होते. त्यानंतर अनेक मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मनसेचे नेत संदीप देशपांडे अजूनही भूमीगत आहेत. त्यांच्याविरोधातही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या अडचणींत वाढ झाली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माझ्या विजयाचं लीड ५ हजारांंपेक्षा जास्त असेल - श्रद्धा जाधव

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT