MNS Leader Post Kunal Kamra Video saam tv
मुंबई/पुणे

Kunal Kamra Video: धन्यवाद कुणाल कामरा! व्हिडिओ पोस्ट करत मनसे नेत्याची सरकारवर टीका

MNS Leader Post Kunal Kamra Video: कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरून मनसे नेते राजू पाटील यांनी सरकारवर टीका केलीय.

Bharat Jadhav

अभिजीत देशमुख, साम प्रतिनिधी

कुणाल कामरा धन्यवाद म्हणत मनसे नेते राजू पाटील यांनी कामराचा व्हिडिओ पोस्ट करत सरकारवर टीका केलीय. कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष जावे, यासाठी राजू पाटील यांनी कामराचा व्हिडिओ पोस्ट केलाय. ट्रॉफिक समस्येवरील कुणाल कामराचे गाणे ट्वीट करीत राजू पाटील यांनी प्रशासनावर हल्लाबोल केलाय.

सरकारला धारेवर धरणारे काव्य केल्याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा वादात सापडलाय. राज्यभरात कामराच्या व्हिडिओची चर्चा असून या व्हिडिओमुळे सरकारमधील नेत्यांची झोप उडालीय. एकनाथ शिंदेंवरील गाण्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद विधीमंडळातही उमटले.

कुणालच्या व्हिडिओचा आधार घेत विरोधकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला होता. त्यामुळे राजकारण तापलं होतं. आता मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी कुणाल कामराचा व्हिडिओ पोस्ट करत सरकारला कोपरखळी मारलीय. कुणाल कामराने मुंबईतील रस्त्यांच्या स्थितीवरून सरकारला घेरलंय. मुंबई शहरातील रस्ते काँक्रिटकरणावरून कामराने सरकारवर निशाणा साधलाय.

कामराचा व्हिडिओ रविवारी झालेल्या कार्यक्रमाचा भाग असल्याचं सांगितलं जात आहे. कामराने 'हवाहवाई' गाण्यातून सरकार हुकूमशाही असल्याचा आरोप केला. कामराचा हा व्हिडिओ ट्विट करत मनसे नेते राजू पाटील यांनी सरकारवर कोपरखळी मारलीय. कल्याण शीळ रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याची समस्या राजू पाटील यांनी मांडलीय. शासकीय यंत्रणांच्या समन्वयाअभावी नागरिकांसह शाळकरी विद्यार्थांना वाहतूक कोंडीचा फटका बसला.

दुपारची एक शाळा बंद करण्याची वेळ आल्याचं राजू पाटील म्हणालेत. या वाहतूक कोंडीच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष जावे, यासाठी राजू पाटील यांनी कामराचा व्हिडिओ पोस्ट केलाय. यात त्यांनी कुणाल कामराचा आभार मानले आहेत. धन्यवाद कुणाल कामरा आम्हा डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडवल्याबद्दल, अशी पोस्ट राजू पाटील यांनी एक्स या सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यावर निशाणा

'हवा हवाई' गाण्यातून अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यावरही टीका केली होती. 'साडीवाली दिदी' म्हणत कामराने त्यांच्या आर्थिक धोरणांवर टीका केलीय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर व्हिडिओ केल्यानंतर कुणाल कामरा वादात सापडलाय. गाण्यातून शिंदेंवर टीका केल्याने शिवसैनिकांकडून त्याला धमकी दिली जात आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंवर केलेला व्हिडिओची चर्चेत असताना त्याच्या नवीन व्हिडिओची क्लिप व्हायरल होत आहे. अर्थमंत्र्यांवर टीका करणारा व्हिडिओ दीड मिनिटांचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT