Marathi language Disrespect  Saam tv
मुंबई/पुणे

Marathi language Disrespect : महाराष्ट्रात चाललंय काय? मला मराठी येत नाही, माझी तक्रार करा; उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाची मुजोरी, VIDEO

Marathi language issue : महाराष्ट्रात मराठीची गळचेपी होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. सांताक्रुजनंतर आता उल्हासनगरमध्ये मराठी भाषेचा अनादर झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

अजय दुधाणे

उल्हासनगर : मुंबईच्या सांताक्रुजमध्ये मराठी माणसावर परप्रांतियांकडून हल्ला झाल्याची घटना ताजी असताना उल्हासनगरमध्येही आरपीएफ जवानाची मुजोरी समोर आली आहे. 'मला मराठी येत नाही, माझी तक्रार करा, अशी मुजोरीची भाषा उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाने वापरली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्याशी बोलताना आरपीएफ जवानाने ही भाषा वापरली आहे. या आरपीएफ जवानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

उल्हासनगर रेल्वे स्थानकात बुकिंगवरून सुरू असलेल्या गोंधळाची माहिती घेण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम गेले होते. त्यावेळी आरपीएफ जवानाने हिंदीत बोलण्यास सुरुवात केली. यानंतर 'मराठीत बोला' असं सचिन कदम यांनी म्हटलं. 'मला मराठी येत नाही, असं प्रत्युत्तर आरपीएफ जवानाने दिलं. त्यानंतर मी डीआरएमकडे तक्रार करतो, असं सचिन कदम यांनी म्हटलं. सचिन कदम यांनी तक्रार केल्यानंतर 'जा माझी तक्रार करा, अशी मुजोरीची भाषा आरपीएफ जवानाने वापरली.

'तुम्हीच हिंदीत बोला'

दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरपीएफच्या मराठी अधिकाऱ्याने उडी घेतली. आरपीएफच्या मराठी अधिकाऱ्यानेही 'त्याला मराठी येत नाही, पण तुम्हाला सुद्धा हिंदी येत नाही का? तुम्ही हिंदीत बोला', असा सल्ला मनसे पदाधिकाऱ्यांना दिला.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा सरकार कामकाजात वापरण्याबाबत जीआर काढलाय. यामुळे सचिन कदम यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचं सांगितलं. मात्र, त्यावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला? असा संतापजनक सवाल मराठी आरपीएफ अधिकाऱ्याने केलाय. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणाची आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घ्यावी. महाराष्ट्रात काम करणाऱ्या परप्रांतीय आरपीएफ जवानांना मराठी भाषेचे धडे देण्याची मागणी मनसेचे सचिन कदम यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: युरिया टंचाईमुळे शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

Nashik Honey Trap : नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढली; ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर्स, व्यावसायिक अडकले

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स

SCROLL FOR NEXT