Bhiwandi Saam
मुंबई/पुणे

MNS Leader: मनसेच्या बड्या नेत्याचा मोठं घबाड उघडकीस, चार किलो गांजा अन्.. पोलिसांच्या कारवाईत आणखी काय सापडलं?

Ganja Smuggling Case: भिवंडी शहरातील कोंबडपाडा परिसरात मनसेच्या भिवंडी शहर उपाध्यक्ष कुमार व्यंकटेश पुजारी (वय ३४) यांना गांजाची तस्करी करताना गुन्हे शाखेने अटक केली आहे.

Bhagyashree Kamble

भिवंडीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मनसेच्या भिवंडी शहर उपाध्यक्षाला गुन्हे शाखेने कारवाई करत अटक केली आहे. गाजांची तस्करी करणाऱ्या प्रकरणी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी ३ किलो ९६० ग्रॅम गांजा, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त केली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कुमार व्यंकटेश पुजारी (वय ३४) असे मनसेच्या भिवंडी शहर उपाध्यक्षाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजारी स्वतःच्या फायद्यासाठी गांजाची साठवणूक आणि विक्री करत होता. भिवंडी शहरातील कोंबडपाडा परिसरात ते गाजांची विक्री करत होते. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी धडक कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल ३ किलो ९६० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तसेच मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरूद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार, गुन्हा दाखल केला आहे. अटक केल्यानंतर त्याना न्यायालयात हजर करण्यात आले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, मनसेसारख्या पक्षाच्या भिवंडी शहर उपाध्यक्षाला गाजांच्या तस्करी प्रकरणी अटक झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का, तसेच इतर टोळ्यांशी याचा काही संबंध आहे का, याचा सखोल तपास भिवंडी गुन्हे शाखा करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT