Abu Azmi Controversial Statement Saam TV
मुंबई/पुणे

Abu Azmi: "औरंगजेब हा वाईट राजा नव्हता" अबू आझमींच्या वक्तव्याचा मनसेकडून समाचार; करुन दिली रमेश वांजळेंची आठवण

Abu Azmi Controversial Statement: यावेळी त्यांनी मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या विधानसभेतील खळखट्याकची आठवण करुन देत अबू आझमींवर निशाणा साधला आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: "औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. औरंगजेबचा खरा इतिहास लोकांसमोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही. सध्या चुकीच्या पद्धतीने त्यांचा इतिहास दाखवला जात आहे." असं खळबळजनक दावा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी केला होता. यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. मनसेचे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी अबू आझमींसह मविआवरही निशाणा साधला आहे. (Abu Azmi Controversial Statement)

हे देखील पाहा -

नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी अबू आझमींच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. सोबतच त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना नेते गजाजन काळे यांच्यावरही टीका केली आहे. यावेळी त्यांनी मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या विधानसभेतील खळखट्याकची आठवण करुन देत अबू आझमींवर निशाणा साधला आहे.

आझमींच्या श्रीमुखात लगावली होती?

मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत आमदार अबू आझमींवर निशाणा साधला आहे. ते, म्हणाले की, "औरंगजेब वाईट नव्हता त्याचा चुकीचा इतिहास दाखवला जातोय. हे बोलणारे अबू आझमी शिवरायांच्या महाराष्ट्रातून निवडून येतात. मविआ सरकारला पाठिंबा दिला म्हणून राष्ट्रवादी आणि उध्दव ठाकरे मूग गिळून गप्प आहे का? या आझमींच्या श्रीमुखात स्व. रमेश वांजळेंनी लगावली होती." अशा आशयाचं ट्विट गजानन काळे यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते अबू आझमी?

माध्यमांशी संवाद साधताना सपा आमदार अबू आझमी म्हणाले होते की, "औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. औरंगजेबचा खरा इतिहास लोकांसमोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही. सध्या चुकीच्या पद्धतीने त्यांचा इतिहास दाखवला जात आहे. त्यामुळे तुम्ही राम पुनियानी यांना भेटा, ते मुस्लीम नाहीत. पण त्यांना औरंगजेबबाबत विचारा, औरंगजेब चांगला मुसलमान होता, याची हजारो उदाहरणं त्यांच्याकडे आहेत. औरंगजेबने कधीही हिंदू-मुस्लिमांमध्ये लढाई केली नाही." महाराष्ट्रात औरंगाबाद, अहमदनगर आणि उस्मानाबाद या तीन शहरांच्या नावात मुस्लीम नाव आहे. ही तीन नावं बदलल्याने जर महाराष्ट्रातील जनतेला नोकरी मिळणार असेल, येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार असतील, विकास होणार असेल तर मी नामकरणाचं स्वागत करेन" असंही आझमी म्हणाले होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT