Pune Metro News saam tv
मुंबई/पुणे

MNS on Pune Metro Station Names : पुण्यातील २ मेट्रो स्थानकांची नावे बदला, मनसेची मागणी

Pune Metro News : शिवाजी नगर व मंडई अशा चुकीच्या ऐकेरी नावांमुळे चुकीचा संदेश जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune News : पुणेकरांना वाहतुकीसाठी नवा पर्याय म्हणून मेट्रो समोर येत आहे. पुणे मेट्रोचं काम वेगाने सुरु आहे. लवकरच मेट्रोल पुण्यातील नागरिकांना सेवेत येऊ शकते. मात्र मेट्रो सुरु होण्याआधीच त्याला वादाची किनार लागली आहे.

पुण्यातील मेट्रो स्थानकांचे नावे बदला अशी मागणीने करत मनसेने आंदोलन केलं. शिवाजी नगर व मंडई अशा चुकीच्या ऐकेरी नावांमुळे चुकीचा संदेश जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. (Maharashtra News)

पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना मनसेने यासंबंधीत निवेदन दिले आहे. पुण्यातील २ मेट्रो स्थानकांचे नाव "छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्थानक" व मंडई भागातील स्थानकाचे नाव "महात्मा जोतिबा फुले मंडई स्थानक" असे ठेवण्यात यावे, अशी मागणी मनसेने केली आहे.

मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह इतर मनसे पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान

New Labour Law: आता नोकरी सोडल्यावर २ दिवसात मिळणार पूर्ण पैसे, काय आहे नवीन नियम?

Black Coffee: वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी रोज पिताय? मग जाणून घ्या ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती?

Famous Historic Places : 'या' किल्ल्याच्या भिंतीवरून दिसतो ताजमहलचा सुंदर नजारा, तुम्ही कधी पाहिलाय का?

Actor Weight Loss Tips: प्रसिद्ध अभिनेत्याने एका महिन्यात कमी केलं ७ किलो वजन; फॉलो केले हे सोपे नियम

SCROLL FOR NEXT