Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Raj Thackeray: मातोश्री काय मशिद आहे का? राज ठाकरेंचा राणा दाम्पत्याला टोला

राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द का केला याचे उत्तर दिले.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) आज पुण्यात सभा होत आहे. गुढीपाडव्याची सभा त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभा, औरंगाबादमधिल सभा झाल्यांनतर आज राज ठाकरे पुण्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत. राज ठाकरे कोणत्या विषयावरती बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने राज ठाकरेंनी आजची सभा महत्त्वाची असणार आहे.

सबंध महाराष्ट्रतून मनसैनिक पुण्यात आले आहेत. राज ठाकरेंनी यावेळी राणा दाम्पत्यावरती टीका केली. मी मशिदीसमोर जाऊन हनुमान चालीसा वाजवा असे सांगितले होते. परंतु राणा दाम्पत्याने मातोश्री समोर जाऊन हनुमान चालीसा वाचायचे ठरवले, आता मातोश्री काय मशिद आहे का? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. राणा दाम्पत्याच्या प्रकरणात काय झाले हे सर्वांनी पाहिले. परंतु नंतर संजय राऊत आणि राणा दाम्पत्य लडाखमध्ये एकत्र दिसले हे पाहून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काहीच वाटत नाही का? असाही सवाल राज ठाकरेंनी केला.

यावेळी राज ठाकरेंनी भाषणाला सुरुवात करण्याअगोदर सभेला आलेल्या अंध विद्यार्थांना मंचावर बोलवून त्यांना पहिल्या रांगेत बसण्याची परवानगी देवून राज ठाकरेंनी सर्वांची मने जिंकली आहेत. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द का केला याचे उत्तर दिले. राज ठाकरे म्हणाले की अयोध्या ट्रॅप आहे हे माझ्या लक्षात आलं. कारसेवकांना ठार मारले गेलं होतं. कार सेवकांच्या त्या ठिकाणाचं दर्शन घ्यायचं होतं. मी अट्टाहास करुन गेलो असतो तर तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या, तुम्हांला जेल मध्ये सडवलं गेलं असतं.

दरम्यान मागच्या काही काळात राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरुन मनसे कार्यकर्त्यांची धरपकड झाली होती. त्याचबरोबर राज ठाकरेंनी नियोजीत अयोध्या दौराही रद्द केला आहे. मशिदीवरील भोंग्यांसदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यभरातील अनेक मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. वसंत मोरे यांनीही भोंग्यांबाबतीत घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे त्यांना शहर अध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावा लागले होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

Nerul Tourism : मॉन्सूनमध्ये नेरुळची सफर ठरेल अविस्मरणीय, वीकेंडला फिरायला 'ही' ५ ठिकाणं आहेत एकदम खास!

Maharashtra News Live Update: पुण्यातील जांभूळवाडी येथील पुलावर भीषण अपघात

Sanjay Gaikwad : बाईबद्दलच्या त्या वक्तव्यानं आमदार संजय गायकवाड अडचणीत; मध्यरात्री थेट गुन्हा दाखल

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार?

SCROLL FOR NEXT