Raj Thackeray on Ayodhya Ram Mandir  Saam TV
मुंबई/पुणे

Raj Thackeray News: राम मंदिराच्या लोकार्पणानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Satish Daud

Raj Thackeray on Ayodhya Ram Mandir

अयोध्येतील राम मंदिराचे आज मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा भव्य दिव्य ऐतिहासिक सोहळा अवघ्या जगाने आपल्या डोळ्यांनी बघितला. प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होताच देशभरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या भव्य दिव्य सोहळ्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली. राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत X अकाऊंटवरून (पूर्वीचे ट्वीटर) एक व्हिडीओ पोस्ट केला. आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली! जय श्रीराम!, असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

कोट्यवधी रामभक्तांचं स्वप्न साकार

गेल्या अनेक दशकांपासून अयोध्येत राम मंदिराची बांधण्यात यावं, अशी रामभक्तांची होती. ती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना स्वत: मोदीही मंत्रांचे पठन करत होते .हा ऐतिहासिक सोहळा पाहताना हजारो डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. कोट्यवधी रामभक्तांचा ऊर अभिमानने भरून आला होता. (Latest Marathi News)

मंत्रोच्चार आणि शंखनाद सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत भावूक झाले होते. दरम्यान, भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची पहिली झलक पाहिल्यावर रामभक्तांना भावना अनावर झाल्या होत्या. ‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’ अशा भावना रामभक्तांनी व्यक्त केल्या.

आज दिवसभर हा सोहळा सुरू असणार असून सोहळ्यानंतर देशभरातील रामभक्तांना प्रसादाचं वाटप केलं जाणार आहे. सोहळ्याची सांगता झाल्यानंतर बुधवार २४ जानेवारी २०२४ पासून राम मंदिर सर्व रामभक्तांसाठी खुलं होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : जुन्नरचे पदाधिकारी पवारांच्या भेटीला; बघा काय केली मागणी

Bigg Boss 18 : सदावर्ते सलमानसोबत तू तू मैं मैं करणार, चक्क गाढवासोबत बिग बॉसच्या घरात दाखल

Beed News : धक्कादायक.. जिल्हा परिषद शाळेच्या आवारात ट्रॅव्हल्स चालकाचा गळफास; मराठा आरक्षणासाठी उचलले टोकाचे पाऊल

Tata Punch CAMO : टाटाची सर्वाधिक विक्री होणारी कार आता नवीन अवतारात! किंमत फक्त 8.45 लाख रुपये, कोणकोणते आहेत फिचर्स?

Jamner News : शेतीतून उत्पन्न नाही, दूध व्यवसायात नुकसान; विवंचनेतून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT