Saam tv  Yandex
मुंबई/पुणे

Sharmila Raj Thackeray: 'माझ्याही मुलीला नको ते मेसेज येतात'; डीपफेक, कमेंट्सवरून शर्मिला ठाकरेंनी व्यक्त केली चिंता

Sharmila Raj Thackeray in Marathi: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला-मुलींना होणाऱ्या त्रासावर भाष्य केलं आहे. तसेच डीपफेक, कमेंट्सवरून शर्मिला ठाकरेंनी व्यक्त केली चिंता

Vishal Gangurde

Sharmila Raj Thackeray News In Marathi:

डीपफेक प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. डीपफेक व्हिडिओ महिला आणि मुलींसाठी एक नव संकट आहे. या डीपफेक प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला-मुलींना होणाऱ्या त्रासावर भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

शर्मिला ठाकरे यांनी जैन तेरापंथ समाजाचे राष्ट्रीय संत आचार्य श्री महाश्रमजी यांचं दर्शन घेतले. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांना जैन समाजाच्या राष्ट्रीय संतांना भेटण्याचं आमंत्रण दिलं होतं. यासाठी जैन समाजाचे प्रमुख पदाधीकारी मनोहर गोखरू, भूपेश कोठारी, ललित जैन आणि दीपक संदाडिया यांनी त्यांची भेट घेतली होती. यानंतर शर्मिला ठाकरे यांनी सांताक्रूझच्या एसएनडीटी महाविद्यालयात जाऊन श्री महाश्रमजी यांचं दर्शन घेतलं. त्यावेळी ठाकरे बोलत होत्या.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, 'माझ्या मुलीला युट्यूबवर कोण कोण लोकं वाट्टेल तसेही मेसेज टाकत असतात. मी याबाबत पोलीस आयुक्तांना अनेकदा तक्रार केली आहे. त्यांनी युट्यूबवर मेसेज टाकणाऱ्या आरोपींना अटकही केली. पण त्यांना काही वेळानंतर सोडावं लागतं. या प्रकारावर चाप बसायला हवा. खरंतर आपल्या देशात ब्रिटिशकालीन कायदे आहेत. त्यामुळे आरोपींना सोडून द्यावं लागतं. म्हणून देशातील कायदे बदलायला हवेत'.

'विधानसभेत या कायद्यात बदल करणं अपेक्षित आहे. त्यात ऑनलाइनचं सकंट भविष्यात उग्र रुप धारण करण्याचा धोका आहे, अशी भीती शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डीपफेक व्हिडिओच्या अभिनेत्री ठरल्या शिकार

गेल्या काही दिवसांपासून आलिया भट्ट, कतरिना कैफ, रश्मिका मंदाना या डीपफेक व्हिडिओ चर्चेत आले होते. या व्हिडिओनंतर अभिनेत्रींनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर डीपफेक व्हिडिओ बनवणाऱ्या आरोपींवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली होती.

एआय तंत्रज्ञान वापरून व्हिडिओ तयार केला जातो. या डीपफेक व्हिडिओनंतर सरकारकडून कारवाई केली जाईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : बांधकाम कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू; नाशिकमध्ये दोन दिवसांत दुसरी घटना

Best Car Features: फक्त ११ लाखांमध्ये मिळणारी 'ही' कार, ५ जबरदस्त फीचर्समुळे देशभरात लोकप्रिय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये ठाकरे गटाकडे फक्त ४ नगरसेवक

Indrayani : आषाढी एकादशी विशेष; 'इंद्रायणी'ला होणार विठुरायाचा साक्षात्कार, पाहा VIDEO

Love Jihad : नगरमध्ये लव्ह जिहादची धक्कादायक घटना! खोटं बोलून लग्न केलं, मुलगा झाल्यानंतर तरुणीला...

SCROLL FOR NEXT